नवीन लेखन...

युरोपायण – दुसरा दिवस – लंडन

कालच्याच मर्सिर्डिस बसनी आज लंडनच्या सीटी टूरला सुरुवात झाली. दूतर्फा दिसणा-या इमारतीतील घरबांधणीची वैशिष्ठ्य सर्वांनाच आकर्षित करत वाह व्वा मिळवात होती. तपकिरी रंगाच्या विटांच्या बांधकामावर पांढ-या शुभ्र रंगाच्या आयताकृती खिडक्या, दरवाजे आणि स्वच्छ काचा हे सर्व एकत्रित फारच उठावदार दिसत होते. या इमारती फार टोलेजंग नाहीत परंतु लांबवर पसरलेल्या आहेत. बाल्कनी आत घेउन रुम वा जागा वाढवणे असा प्रकार कुठेच दिसला नाही!!

आजच्या सीटी टूरसाठी एका इंग्लिश गाईडची खास नेमणूक झाली होती. चालत्या गाडीतुन तीने केलेल लहानमोठ्या ऐतिहासिक वास्तुंच धावत वर्णन पाठांतरीत वाटल तरी सविस्तर आणि रंजक होत. एखाद तासात पहिला फोटो स्टॉप आला आणि 18°C तापमानात आम्ही सर्वजण शाळकरी मुलामुलींप्रमाणे दोघा दोघांच्या जोडीनी बोट धरुन गाईडच्या मागोमाग निघालो. सर्वांनी भरपूर फोटो काढले. नंशनल गँलरी परिसरात वॉशरुमच्या वापरासाठी ५ जणात १ पौंड (प्रत्येकी रु 90) अशी किंमत आकारण्याच्या जाचक पध्दतीनी सर्वांनाच धक्का बसला पण ब्रीटिश रुलपुढे कोणाचाच ईलाज नव्हता!! पुढे युरोपभर हाच नियम कठोर होणार होता हाही धक्का आम्हाला सोसावा लागला आणि त्यातूनच थंड हवा तेथील राज्यकर्त्यांच्या चांगलीच पथ्थ्यावर पडत असणार असा निश्कर्श नकळत निघाला.

आज पहाण्यात आलेल्या प्रत्येक ईतर वास्तूंचा संपूर्ण वृतांत शक्य नसला तरी दोघांचा उल्लेख करण गरजेच आहे. लेखाच्या शेवटी ईतर सर्वांचा नामोल्लेख केला आहे.

बकिगहँम पँलेसच्या चेंजींग द गार्ड सोहळ्यासाठी आज बुधवार असल्यामुळे हजारो टूरिस्टनी हजेरी लावली होती. राणीच्या निवसस्थानाच्या सुरक्षेची व्यवस्था पहाणा-या गार्डच्या शिफ्टमधील अदलाबदल अस या सोहळ्याच स्वरुप असल तरी राजेशाही भपक्यात हा सोहळा परंपरेनी पार पाडला जात असतो. मला हा व्यक्तीपूजेचा आतिरेक वाटला आणि डोक्यात खूपच विनोदी कल्पना प्रसुत होउ लागल्या उदा. आमच्या सोसायटीच्या सुरक्षारक्षकांची शिफ्टही दर बारा तासांनी बदलते, कंपनीत तर चार वेळा शिफ्ट चेंज असायचा; पण अस कधीच नसायच!!

जेवणानंतर मँडम तूसां वँक्स म्युझियम पहाण्यासाठी अडीच तास राखून ठेवले होते. जगप्रसिध्द व्यक्तींच्या मेणाच्या पुतळ्यां व्यतिरिक्त करमणूकीचे इतरही काही कार्यक्रम येथे चालु असतात; टँक्सी राईडही असते. कोहली, दीपिका, ट्म्प अप्रतीम जमलेतं. मोदीजींचा फक्त चेहरा जमलाय पण उंची मात्र कमी वाटली; कत्रीना, माधुरी, प्रीयंका वगैरे भारतीय तसेच काही आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी माझी घोर निराशा केली आणि त्या नैराशापोटीच माझ्या पुतळ्यासाठी मी साफ नकार द्यायच ठरवल आणि एग्झीट केल!!

आज पहाण्यात आलेल्या ईतर वास्तु:

Natural History Musium, Science Musium, Victoria and Albert Musium, Herrods most expensive departmental house, Residential House worth 140 million pounds presented by Laxmi Mittal to his daughter, 10 Dowing Street – the official residence of British PM,
House of Commons and House of Lords, London Bridge, Westminster Abbey, Victoria Station, Victotia Palace, Victotis Street, Victoria Underground Station, House of Parliament वगैरे.

उद्य समुद्रातील बोगद्यातूत जाणा-या युरोस्टार ट्रेननी लंडनहून पँरीसला निघालोय.

प्रकाश तांबे
8600478883

Avatar
About प्रकाश तांबे 45 Articles
मी प्रकाश तांबे, पुणे. गेले तीन-चार वर्षे मी वर्तमानपत्रे व सोशल मीडीयावर सातत्याने लिहित असतो. जाणकार वाचकांच्या प्रतिक्रीयेने मला नेहमीच स्फूर्ती मिळत असते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..