ऐलमा पैलमा गणेश देवा
माझा नवरा बदलून दे, करीन तुझी सेवा
जन्मोजन्मी कसले, एका जन्मी झाले बोsssर
मी नाही गुंडाळायची, वडाला आता दोsssर
हरतालकेचा उपासही नाही करणार
ऐलमा पैलमा गणेश देवा…….
सांगते ऐका तुमचा मी, कां करते धावा
संसाराला आता माझ्या, वर्ष झाली तेरा
नव्या नवलाईचे वाजले की बारा,
नवरा कशा-कशामध्ये लक्ष देखील घालेना,
संसाराचा गाडा मला एकटीला झेपेना,
धडा शिकवू ह्यांना अस आलय माझ्या मना
म्हणून म्हणते हात जोडून गणेश देवा
Exchange Offer च, तेवढ मनावर घ्याना
मीच काय किती जणी
करतील तुमची सेवा
ऐलमा पैलमा गणेस देवा……….
— सौ.अलका वढावकर
Leave a Reply