अनुभव साठा, जवळी असावा ।
नसे तयावीण, जीवनीं विसावा ।।
अनुभूती विना, शब्द कैसा रुचावा ।
नर वाचाळ दूर, ऐसा करावा ।।१।।
अनुभूती सारखा, नागुरू कोणी ।
भावे सर्वां, अनुभवाचीच वाणी ।।
लीन सारेच, अनुभूती चरणीं ।
ठरते श्रेष्ठ, म्हणूनी गुरुवाणी ।।२।।
थोर ज्यांच्या अनुभवांची संपदा ।
तेचि सार्या, पार करीती आपदा ।।
अनुभूतीस, पूज्य करिती आपदा ।।
अनुभूतीस, पूज्य मानूनि वंदा ।
कास अनुभवाची धरावी सदा ।।३।।
मती कुंठता, अनुभूती देई साथ ।
दिशा सार्थ देण्या, मार्गदावी खास ।।
देऊनि आधार, लाभेमनां प्रकाश ।
येईमनां अपुल्या, उभारी झकास ।।४।।
अनुभवे, जगीं ज्ञानी होती शहाणे ।
शिजवती ते, काया, जनां कारणे ।।
दांभिकतेचे नको कधी, बोलणे ।
करावे पसंत, अशांना टाळणे ।।५।।
अनुभूतींतूनि, न होती, जे शहाणे ।
दु:ख येते नशीबीं तया भोगणे ।।
जाते कठीण, मार्ग त्यातुनि शोधणे ।
हातीं उरते, ते यातना, सोसणे ।।६।।
नसावा आग्रह, अपुल्या प्रचीतीचा ।
असे अनुभव सार्थ, ज्याचा तयाचा ।।
होई तयाने, निर्धार पक्का मनाचा ।
आनंद निखळ घ्यावा स्वानुभवाचा ।।७।।
अनुभूती छायेत सदा असावे ।
बहरुनि जीवनीं, सुगंधे फुलावे ।।
स्थित प्रज्ञा सम, व्यवहारी रहावे ।
होऊनि लीन, हृदयीं, ईर्शा स्मरावे ।।८।।
।। ॐ श्री गुरुदेवदत्त समर्थ ।।
-गुरुदास / सुरेश नाईक
२५ डिसेंबर २०१२, नाताळपुणे –
३०“सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…
— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास
Leave a Reply