ईश्वर आणि प्रेम !
प्रेम हे ईश्वराचं दुसरं नांव ।।
अन् निरामय आनंद हा प्रेमाचादृष्यमान अविष्कार ।।
दीपावलीची सुरम्य, अभंग-मंगल घटिका हे,
स्नेह आणि आंतरिक प्रिती, वर्धनाचे
निरागस लोभसवाणे रूप अंतरीच्या उत्कट
भाव-भावनांचे संतोषदायी, सौख्यदायी प्रकटीकरण
अशा या सुखदक्षणी, सुख-समृद्धीची, वैभवाची,
आरोग्य-संपदेची अन् चिन्मय आनंदाची गंगा
आपल्या जीवनीं दुथडी भरुन सदैव वहात
राहो, हीच या शुभ समयीं गुरु-माऊली चरणीं प्रार्थना.
-गुरुदास / सुरेश नाईक
६ नोव्हेंबर २००५,
“टीप-टॉप”, ठाणे
— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास
Leave a Reply