डोळा ह्या अवयवाकडे आपण जरा डोळसपणे बघायलाच हव. काणा डोळा करण्या सारखा तो अवयव नाही. असतात दोन, पण एकमेकांकडे न बघता एकेच ठिकाणी एकाच वेळी बघतात. मोठे केले की भिती, विस्फारले की आश्चर्य, मिचकावले की खोट खोट आणि एकच मारला की मार खायची लक्षण! कधी काळे, कधी पिंगट, कधी घारे व कधी कधी राजकपूरसारखे निळे. घारे डोळे तर विशिष्ट पोट जातीला जन्म खुणेसारखेच चिकटलेत. जाणकाराचा पोटजातीबाबतचा अंदाज क्वचितच चुकतो. सौंदर्यस्पर्धेत डोळ्यांना ईतर सर्व आयटेमस् पेक्षा जास्त मारक्स् असावेत. मिस इंडीया, मिस युनिव्हर्ससारख्या सौंदर्य स्पर्धेत विजयश्री मिळालेल्या स्पर्धकाचे चमकणारे डोळे बघायचे असतील तर दिलीप प्रभावळकरांचा हसवाफसवी बघायलाच पाहिजे. विवाह, नोकरी, ड्रायव्हिंग वगैरे ठिकाणीही हा अवयव भाव खाउन जातो. बाँसच्या लाडक्यालाही ब्लु आईड बाँयच म्हणतात. इतर कुठल्याही नाही पण “डोळे” ह्या एकमेव अवयवानी आडनाव होण्याचा मान पटकवलाय. पोटे, एकबोटे नावात आढळणारी भेसळ यात नाही. चित्रपटाच्या नावातही हे असतात उदा. आंखे, दो आंखे बारा हाथ, वगैरे. तसेच काव्य, गाणे यातही याचा वावर असतो. उदा. भा रा तांब्यांच डोळे हे जुलमी गडे, डोळ्यात वाच माझ्या, आंखो आंखोमे बात होने दो, वगैरे. खुनशी, भेदक, मग्रुर, करारी वगैरे विशेषणेही आपल्या गरज व श्रध्देप्रमाणे एखाद्याच्या डोळ्यांना लाउ शकतो. डोळ्यांच्या अनन्यसाधारण महत्वामुळेच आपण चश्मा, लेन्स, गाँगल या सारख्या आयुधांनी त्यांचे लाड पुरवतो. दूरद्रुष्टी वा वक्रद्रुष्टी या संकल्पनांपासुन हे नामोनिराळेच असतात; मात्र चाळीशी व तिरळेपणाशी ह्यांचे घनिष्ठ संबंध आहेत.
काश्मीरचे सृष्टी सौंदर्य वस्तुत: सर्वांसाठी सारखेच असते. फरक फक्त बघणार्याच्या सौंदर्य द्रुष्टीत असतो. Beauty is in the eyes of beholder! त्यासाठी डोळे सुंदरच असावे असा कुठलाही निकष लागु होत नसुन. नेत्रसुखाच भाग्य लाभण्यासाठी नशीबानीच भाग्यवान पाहीजे.
मरलीन मनरोमुळे गाजलेले जाँन केनेडी असोत, मोनीका लेविन्स्की मुळे गाजलेले बिल क्लिंटन किंवा कोणत्याही एका नावाला न चिकटलेले ट्रंप असोत हेवा वाटावा असे भाग्यवान डोळे श्रीराम नेन्यांचेच हे मान्य करायलाच हवे.
— प्रकाश तांबे
8600478883
Leave a Reply