तो आणि ती
समोरच्या बिल्डींगमध्ये रहात,
माझी फारशी ओळख नाही ,
परंतु येता जाता फक्त ‘ स्माईल’ किंवा हॅलो.
इतकीच ओळख आमची..
परंतु लेखक असल्यामुळे प्रत्येकाच्या
आयुष्यात डोकावण्याची वाईट सवय.
खरे छान आयुष्य होते.
एक साधी कार ,
मुलबाळ नाही. लग्नाला बरीच वर्षे झाली असणार.
कदाचित पुढ़े संभाळणार कोण?
हा प्रश्न असणार.
माझे आपले मनातल्या मनात.
दोघे नोकरी करत असतील तर
गाडी , घर सर्व घेतात ,
अर्थात प्रत्येकाला बँकांच्या कर्जाचे भान ठेवावेच लागते.
साहेबानी लॉक डाऊन जाहीर केला.
नवे आठ पंधरा दिवस संपले.
आणि ..
घरघर सुरु झाली.
आता तर ही घरघर सगळीकडे दिसते.
तर ..
हल्ली ते दोघे दिसत नाहीत.
कदाचित वर्क फ्रॉम होम.असेल.
आज सकाळी मात्र त्या सोसायटीखाली
पोलीस गाडी आणि ऍम्ब्युलन्स, फायर ब्रिगेडची गाडी दिसली.
मी खाली आलो. तो सुद्धा मास्क लावूंन
सोसायटीच्या वॉचमनला म्हणालो काय झाले.
वे दोनो गॅलरी से कुद गये…?
मला वाटले ते दोघे …
म्हणजे.
कारण लोक त्याच मजल्यावर बघत होते,
दोघे जिवंत होते म्हणतात.
कारण खाली काम चालू होते लॉकडाऊन पूर्वी … नेट तसेच होते….काढले नव्हते
पोलिसानी आत्महत्या करत असल्याचा गुन्हा
निश्चित लावणार त्यांच्यावर.
का प्रश्न विचारेल.
पण सोल्युशन ते देऊ शकत नाहीत.
हे सत्य होते.
जसा त्यांना जगण्याचा अधिकार आहे, तसा मरण्याचाही असावा.
हा विचार ?
वयाच्या ६० वर्षानंतर अनेकांना पडत असणार जसा मला पडला.
खरेच त्यामुळे प्रॉब्लेम सोडवला जाईल.
माझ्या डोक्यात भन्नाट विचार भिरभिरत होते.
इतक्यात बाजूच्या रस्त्यावर नजर गेली.
ते दोघे नवरा बायको मास्क लावून येत होते..
डिस्टन्स ठेवून.
मग उडी कोणी मारली…?
….
मी भानावर आलो. ..
म्हणजे..
मी माझ्या गॅलरीमध्ये बसून विचार करत होतो…?
माझी गॅलरी ……
आठव्या मजल्यावर आहे….
आणि समोर जाळी आहे …
मी एक सुस्कारा सोडला …..
घरात येऊन बसलो…
मीच माझ्या ….
माझ्या चेहऱ्याशी बोलत होतो तर..
उडी मारणारे ते दोघे नव्हते तर
म्हणजे…मी गच्च डोके धरून बसलो…
तसाच जरा वेळाने घरात आलो…
नेहमीप्रमाणे
त्याच त्या ‘अतिरंजित’ मूर्ख बातम्या बघू लागलो..
— सतीश चाफेकर.
Leave a Reply