आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्यासाठी अपयशाचा अर्थ आजच्यापेक्षा वेगळा होता. जेव्हा तुम्ही सायकल चालवायला शिकत होता तेव्हा तुम्ही पडलात, बऱ्याचवेळा पडलात. कदाचित तुमचे गुडघे फुटले असतील, रडला असाल पण तुम्ही परत उठलात. पुन्हा पेडल मारायला सुरुवात केली आणि काही काळातच तुम्ही अशी सायकल चालवू लागता की जशी तुम्ही ती गोष्ट बऱ्याच आधीपासून करत आहात.
जसजसे आपण मोठे होतो तसतशी आपण हा दृष्टीकोन हरवून बसतो. आपण तो परत मिळवायला पाहिजे.
‘अपयश’ ही तुमच्या आयुष्यात घडण्यासारखी एक छान गोष्ट आहे.
१ तुम्ही शिकता.
अपयशाकडे एक भयानक अनुभव म्हणून पाहण्यापेक्षा आपण त्याच्याकडे शिकण्याची एक संधी म्हणून पाहावी. जेव्हा तुम्ही अपयशी होता तेव्हा स्वतःला खालील प्रश्प विचारा की या अपयशातून मला काय शिकता येईल. प्रत्येक अपयशात एक किंवा एका पेक्षा जास्त शिकण्यासारख्या गोष्टी असू शकतात.
२ तुम्हाला अभूतपूर्व अनुभव मिळतात
आपण इतरांच्या चुकातून आणि अपयशातून शिकतो. पण काही वेळेस शिकण्यासाठी आपल्यालाही अपयशाला सामोर जाणं गरजेचं आहे. त्यातून आपल्याला असे अनुभव मिळतात की जे नुसत्या शब्दातून अनुभवस येत नाही.
३ तुमची ताकद वाढते.
ज्यावेळेस तुम्ही अपयशी होता, तेव्हा प्रत्येक अपयशाबरोबर तुमच्या मनाची ताकद वाढत जाते.
४ यशस्वी होण्याची शक्यता वाढते
प्रत्येक अपयशाबरोबर तुम्ही शिकता आणि त्याबरोबर तुमच्या मनाची ताकद वाढते. त्यामुळे तुमची यशस्वी होण्याची शक्यता फार वाढते. म्हणूनच अपयशाला यशाची पहिली पायरी असं म्हटले जाते. अपयशातून आलेले अनुभवच आपल्याला यशस्वी करतात.
संकलन – अमोल सातपुते
Leave a Reply