नवीन लेखन...

कुटुंब समृद्धी बाग आणि राहाणीमान

कुटुंब’समृद्धी बागेमुळे आपले घर व परिसर आकर्षक दिसतो. कुटुंबाचे आहार पोषण मूल्य सुधारते. जेवण रुचकर होते. शेतीच्या उत्पादनात चढउतार आले तरी कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर त्याचा अनिष्ट परिणाम होत नाही.

या बागेत घरात स्वतंत्र स्वयंपाकघर, स्नानघर व शौचालय व्यवस्था असावी. थोड्या घरापासून अंतरावर गोठा व गोबर गॅस संयंत्र उभारावे. शौचालयातील मैला त्याला मिळेल अशी व्यवस्था करावी. हल्ली केवळ शेणापासूनच गॅस तयार होण्याची वाट पाहाण्याची गरज नाही. पुण्यातील एक तज्ज्ञ डॉ. आनंद कर्वे यांनी गवत, स्वयंपाकघरातील भाज्यांचे देठ, जेवणातील खरकटे वापरून गॅस तयार करण्याचे तंत्र संशोधित केले आहे. त्यावर आधारित संयंत्र बागेत बसवलं तर इंधनाची उत्तम सोय होईल. घरातील धूरही हद्दपार होईल. या संयंत्रामधील उर्वरित भागाचा खत म्हणुनही उपयोग करता येतो.

दुधासाठी ऐपतीनुसार व सांभाळण्याच्या कुवतीनुसार शेळी, गाय वा म्हैस घ्यावी. बागेचे क्षेत्र थोडे वाढवून या जनावरांसाठी बारमाही ओल्या चाऱ्याची व्यवस्था करावी. मधमाशी हा एक उपयुक्त किटक आहे. आधुनिक मधमाशी घरात राणीमाशीसह मधाचे पोळे ठेवले तर वर्षभर विनाखर्च मध मिळतो. सातपुडा माशीच्या दोन-तीन पेट्या अवश्य ठेवाव्यात. मांसाहार करणाऱ्यांनी पाच ते दहा कोंबड्यांचा बंदिस्त पिंजरा ठेवला तर रोज ताजी अंडी मिळू शकतात. कोंबड्यांशिवाय बदकेही पाळता येतात. घरच्या लोकांना नियमित मासे मिळण्यासाठी एखादा छोटा तलाव बांधून त्यात मासेपालन करता येते. घरबसल्या मासे मिळवता येतात. बंगालमधील शेतकरयांजवळ घराजवळच तलाव असतात. तेथून त्यांना रोज ताजी मासळी खाण्यासाठी मिळते. मोठ्या bp तलावाऐवजी बागेत मर्यादित आकाराचे हौद बांधूनही गरजेपुरते मासे मिळवता येतील.

थोडी कल्पकता दाखवली, थोडी गुंतवणूक केली तर अशा समृद्धी बागेपासून TFC की दीर्घकालीन फायदा मिळवता येईल. आपले राहाणीमान समृद्ध व संपन्न बनवता येईल. घराजवळच अशी समृद्धी बाग तयार केली आणि कुटुंबातील सर्वच घटक यात सहभागी असतील तर कुटुंबियांना आपल्या कष्टाचे फळ मिळाल्याचे समाधान मिळेल व त्या कुटुंबात साहजिकच समृद्धी येईल.

प्र. बा. भोसले (पुणे)

मराठी विज्ञान परिषद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..