कुटुंबे समृद्धी बाग तयार करताना जमिनीचे सपाटीकरण, बांधबंदिस्ती वगैरे जमिनीला खत देण्यापूर्वीच करावे. जमीन हलकी असेल तर किमान १५ ते २० सेंटिमीटर खोल माती राहील इतकी गाळाची वा काळी कसदार माती या क्षेत्रात टाकून घ्यावी. शेणखताबरोबरच तिसरा हिस्सा कोंबडी खत व तिसरा हिस्सा लेंडी खत मिसळून टाकले तर अधिक फायदा होईल.
खताची कामे झाल्यावर खरीप हंगामात समृद्धी बागेची सुरुवात करावी. या बागेची कल्पना नेहमीच्या शेतीपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे कुटुंबातील स्त्रियांना सगळे लगेच जमेल असे नाही. हळूहळू त्यांना जमेल, झेपेल असे काम द्यावे.
सर्वप्रथम वेलीभाज्यांनी सुरुवात करावी. त्यांचा फायदा असा की त्यांच्यासाठी बी कमी लागते. या भाज्या चांगल्या वाढून अनेक दिवस उत्पादन देतात. बी-बियाणांच्या दुकानात अशा बहुतेक भाज्यांचे बी मिळते.
वेलीभाज्यांत काकडी वेलीभाज्या आणि दोडका वेलीभाज्या असे दोन प्रकार असतात.
काकडी, वाळूक, कारली, दोडका, दुध्या, पडवळ, तांबडा भोपळा, कोहळा, घोसाळी, ढेमसे, तोंडली, परवर या भाज्या तसेच खरबूज, कलिंगड ही फळे लावता येतात. या. भाज्यांना शेतातीलच झाडांच्या फांद्या, बांबू, मेंढ्या, तूरकाट्या, शेवऱ्या, पळाट्या अशा साहित्यापासून मांडव करता येतो. मांडवामुळे भाज्या निरोगी वाढतात. त्यांची फळेही जास्तीतजास्त मिळतात. कीड, रोग आल्याचे लगेच कळते. त्यावर ते वाढण्यापूर्वीच उपाय करता येतात.
घेवडेवर्गीय भाज्यांत सोलापुरी घेवडा, डबलबीन, लायमाबीन, वालपापडी, चवळी, शेंगभाज्यांत वाटाणा, गवार, भेडी, श्रावणघेवडा, जि पावटा (वाल), तूर, शेवगा, हादगा; मेथी, शेपू, चवळी, राजगिरा, करडी, अंबाडी अशा गाम पालेभाज्या; कोथिंबीर, उप 53 पुदिना, कांदा, लसूण, आले अशा मसालेभाज्या; मुळा, गाजर, बीट, माईनमूळ अशा मूळ व कंद भाज्या, कोबीवर्गीय भाज्या; टोमॅटो, ढोबळी मिरची, पुंड्याऊस अशा फळभाज्या; कडधान्ये, तृणधान्ये, फळझाडे, डी फुलझाडे, इतर उपयुक्त झाडे (बांबू, साग, शिवण, शिसव, चंदन, कडुलिंब), औषधी झाडे या बागेत लावता येतील.
-प्र.बा. भोसले (पुणे)
मराठी विज्ञान परिषद,
Leave a Reply