प्रसिद्ध लेखक आणि डेबोनिअर या वादग्रस्त मासिकाचे माजी संपादक अनिल धारकर यांचा जन्म १९४७ साली झाला.
पत्रकार, लेखक, वास्तुविशारद अशा अनेक क्षेत्रात अनिल धारकर यांचा गेली पाच दशके वावर होता. सेन्सॉर बोर्डाच्या सल्लागार समितीचे ते सभासद होते. अनिल धारकर यांनी देबोनायर, मिड-डे, संडे मिड-डे, द इंडीपेंडेंट व द इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया मध्ये काम केले होते. अनिल धारकर हे दरवर्षी नोव्हेंबर मध्ये मुंबईत होणाऱ्या लोकप्रिय मुंबई इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलचे संस्थापक होते. दक्षिण मुंबईत आर्ट मुव्ही थिएटर (आकाशवाणी सभागृहात) सुरू करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. ‘टाटा लिटरेचर लाइव्ह’चे उद्गा ते म्हणूनही त्यांची ओळख होती. महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रेवर आधारित ‘द रोमॅन्स ऑफ सॉल्ट’ या पुस्तकाचे लेखन धारकर यांनी केले. दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रमांचे निर्माता, सूत्रसंचालक, त्याचप्रमाणे वृत्त वाहिन्यांचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले. तसेच अनिल धारकर यांनी पोसिबल ड्रीम व सॉरी नॉट रेडी ही पुस्तके लिहिली आहेत.
अभिनेत्री आयशा धारकर या त्यांच्या कन्या होत.
अनिल धारकर यांचे २६ मार्च २०२१ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply