प्रसिद्ध उद्योजिका व बायोकॉन या विख्यात औषध कंपनीच्या अध्यक्षा किरण मजूमदार यांचा जन्म २३ मार्च १९५३ रोजी बेंगळुरू येथे झाला.
किरण मजूमदार शॉ भारतातील एकट्या अशा बिझइनेसवुमन आहेत, ज्या आपल्या हिमतीवर अब्जाधीश झाल्या आहेत.
किरण मजूमदार शॉ यांनी १९७८ मध्ये ऑस्ट्रेलियामधून अल्कोहोल बनवण्याच्या प्रक्रियेत मास्टर्सची डिग्री घेऊन भारतात परतल्या होत्या तेव्हा त्यांनी अनेक दारू बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज केले होते पण सगळ्या कंपन्यांनी त्या महिला असल्याचे कारण देउन त्यांनी नकार दिला होता. योग्यता असून देखील त्यांनी नोकरी मिळाली नाही त्यामुळे त्या स्कॉटलंडला गेल्या. तेथे त्यांनी ब्रूवरीवर नोकरी केली. तिथेच त्यांचे नशीब बदलले आणि बायोकॉनची सुरूवात झाली.
स्कॉटलंडमध्ये काम करताना त्यांची भेट आयरिश उद्योगपती लेस्ली औचिनक्लॉससोबत झाली. लेस्ली यांना भारतात फार्मास्युटिकल्स व्यवसाय सुरू करायचा होता. त्या किरण यांच्या कामातून खुप प्रभावित झाल्या आणि त्यांनी किरण यांना भारतात कंपनी सुरू करून पार्टनर होण्याची ऑफर दिली. सेस्ली यांचा प्रस्ताव पाहून किरण खुप हैराण झाल्या, कारण त्यांना व्यवसायाचा कोणताही अनुभव नव्हता आणि त्यांच्याकडे गुंतवण्यासाठी पैसेही नव्हते. पण तरीही लेस्ली यांनी किरण यांना पार्टनर होण्यास तयार केले आणि अशा रितीने १९७८ ला बायोकॉनची सुरूवात झाली. किरण यांनी भारतात करून एका गॅरेजमधून केली. नंतर त्यांना माणसे जोडायला खुप अडचणी आल्या कारण त्यावेळस एका महिलेसोबत काम करण्यास कोणीही तयार होत नसे, फक्त पुरूषच नाही तर महिलांनादेखील अशा कंपनीत काम करायचे नव्हते ज्याची बॉस एक महिला आहे. अनेक लोकांनी इंटरव्ह्यू दिला पण कोणीही नोकरी देण्याच्या लायकीचा नव्हता त्यामुळे शेवटी त्यांनी एका रिटायर्ड गॅरेज मॅकेनिकला आपला पहिला कर्मचारी बनवले. व्यवसायासाठी पैशांची जुळवाजुळव करणेदेखील कठिण होते. बँक पण एका २५ वर्षांच्या मुलीवर विश्वास ठेवायला तयार नवह्ती. काही काळानंतर एका महिलेने त्यांना कर्ज दिले आणि त्यांनी आपल्या कौश्यल्याच्या जोरावर बायोकॉनला देशातील सगळ्यात मोठ्या फार्मा कंपनीच्या यादीत नेले.
आज त्या सदतीस हजार कोटींच्या कंपनीच्या मालकिण आहेत. किरण मजूमदार शॉ या आज फोर्ब्ज मॅगझिनने जाहीर केलेल्या जगातील १०० प्रभावशाली महिलांच्या यादीत सामील आहेत.
किरण मुजूमदार शॉ बायोटेक्नॉनलॉजी कंपनीत संशोधकांच्या एकूण स्टाफपैकी ३५ टक्के मुली आहेत.
किरण मजूमदार शॉ आणि पति जॉन शॉ यांनी यूकेच्या ग्लासगो विद्यापीठाला जुलै २०१९ मध्ये ७५ लाख डॉलर (५२.५ कोटी रुपये) देणगी दिली आहेत.
२०२० मध्ये किरण मजूमदार शॉ यांना ऑस्ट्रेलिया सरकारने आपला सर्वोच्च नागरिक सम्मान ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ ने सन्मानित केले आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply