हरिहरन मुंबईत लहानाचे मोठे झाले. विज्ञान व कायदा या शिक्षण शाखांच्या पदव्या घेतल्या आहेत. त्यांचा जन्म ३ एप्रिल १९५५ रोजी झाला.हरिहरन यांनी हिंदी, मल्याळम, कन्नड, मराठी अशा अनेकविध भाषांत गाणी म्हणली आहेत. ते एक उत्तम गझल-गायकही आहेत. ते उत्तम मराठी बोलतात. अलमेलू हे त्यांचे संगीतातले पहिले गुरू होते. संगीतकार रेहमान यांनी हाय रामा(रंगीला), सून री सखी (हमसे है मुकाबला), भारत हमको जानसे प्यारा है (रोजा) या गाण्यांतून शास्त्रीय-उपाशास्त्रीय धाटणीचा गायक अशी मा.हरिहरन यांची प्रतिमा निर्माण केली आणि ‘टेलिफोन धून मे हसने वाली’ (हिंदुस्थानी), यू ही चलाचल (स्वदेस) सारख्या उडत्या चालीच्या गाण्यांनी ती धुऊन काढली. रेहमान-हरिहरन जोडीने दिलेली सर्वात सुंदर गाणी विरहगीत या प्रकारात मोडतात. रोजा जानेमन (रोजा), तू ही रे.. (बॉम्बे), चंदा रे चंदा रे (सपने) हरिहरन यांनी गायलेल्या चित्रपट-गीतांमधील यादें(यादें), झौका हवा का (हम दिल दे चुके सनम), कितनी बातें(लक्ष्य), ही विरहगीते नेहमीच मनात घर करून बसतात. हरिहरन यांनी भारतीय फ्युजन संगीतात मूलभूत काम केले. त्यांचा अल्बम “कलोनियल कझिन्स‘ याची साक्ष देतो. कलोनियल कझिन्स! हा एक गाजलेला अल्बम यातील ‘कृष्णा नीबे..’ ‘ओ हो काय झालं..’ ‘सा नि धा पा..’ अशा गाण्यांनी लेस्ली लुईस आणि हरिहरन या जोडीने भारतीय संगीतात एका वेगळ्याच संगीतप्रकाराची भर घातली. पण, गझल हा त्यांचा खास जिव्हाळ्याचा विषय. “गझल तुम्हाला नेहमीच मध्यममार्गी अनुभव देते. खयाल, ठुमरी, कव्वाली असे केवढे तरी वैविध्य यात आहे. संगीतात तीन दशकांहून आपल्या अधिकच्या कारकिर्दीत त्यांनी नौशादजींपासून जयदेव, लक्ष्मीकांत प्यारेलाल, इलयाराजा, रहेमान, अजय-अतुल आणि त्यांचा मुलगा अक्षय अशा अनेक संगीतकारांसोबत काम केले. अक्षयने गेल्या वर्षी आलेल्या “कोकणस्थ‘ला संगीत दिले होते. २००४ साली हरिहरन यांनी भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
हरिहरन यांची गाणी
https://www.youtube.com/watch?v=cuMYU4bqZ_A
Leave a Reply