सुप्रसिध्द अभिनेत्री वत्सला देशमुख यांची कन्या असलेल्या रंजना देशमुख यांनी लहानपणीच कलाक्षेत्रात पदार्पण केले.
१९७०-८०च्या दशकांत अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांमधून रंजना देशमुखांनी विविधांगी भुमिका साकारल्या. व्ही. शांताराम निर्मित व किरण शांताराम दिग्दर्शित चंदनाची चोळी, अंग अंग जाळी या चित्रपटातून १९७५ साली मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पुढे व्ही. शांताराम यांच्या झुंज या चित्रपटातून प्रमुख नायिकेची भूमिका साकारली. ‘अरे संसार संसार’ आणि ‘गुपचुप गुपचुप’ या चित्रपटातील भूमिकेसाठी रंजना देशमुखला राज्यसरकारचा ‘उत्कृष्ट अभिनेत्री’चा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
रंजना देशमुख यांचे इतर प्रमुख चित्रपट म्हणजे ‘सुशीला’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘जखमी वाघीण’, ‘भुजंग’, ‘एक डाव भुताचा’, आणि ‘चानी’. रंजना देशमुख यांनी ‘फक्त एकदाच’ या नाटकातून मराठी रंगभूमीवर पदार्पण केले.
मराठी १९८७ मध्ये ‘झुंजार’च्या चित्रीकरणासाठी तेव्हाच्या बंगलोरला जाताना मोटार अपघातात त्या कायमच्या अपंग झाल्या. पायच निकामी झाल्याने त्यांची चित्रपट कारकीर्दच अकस्मात संपुष्टात आली.
रंजना यांचे ३ मार्च २००० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ : इंटरनेट
Leave a Reply