नवीन लेखन...

प्रसिद्ध सरोद वादक अली अकबर खान

मल्हार घराण्याचे सरोद वादक अली अकबर खान यांचा जन्म १४ एप्रिल १९२२ रोजी आत्ताच्या बांगला देश मध्ये असलेल्या शिबपूर नावाच्या खेड्यात झाला. त्याच्या वडलांनी म्हणजे अलाउदीन खान यांनी अनेक रागात शास्त्रीय संगीतातातील रचना बांधल्या त्याप्रमाणे काही चित्रपटांना पाश्वसंगीत दिले.

त्यांनी कोलकत्ता येथे १९६७ साली संगीताचे अली अकबर कॉलेज काढले पुढे अमेरिकेतील सॅन रफेल येथे नेण्यात आले , त्याच्या शाखा बसेल आणि स्विझर्लंड येथेही आहेत करंट अली अकबर खान आधीच अमेरिकेत स्थायिक झालेले होते. ते १९५५ साली अमेरिकेत स्थाईक झालेले होते ते सुप्रसिद्ध व्हायोलीन वादक यहुदी मेहुनीन यांच्या सांगण्यावरून.

उस्तादजींना त्यांच्या वडलांकडून अनेक वाद्याचे प्रशिक्षण मिळाले पण ते सरोदकडे जास्त आकर्षित झाले .त्यांचे वडील अलाउदिन खान कडक शिस्तीचे होते. पहाटेच त्यांचे संगीताचे धडे सुरु होत ते अठरा तास चालत. उस्तादजी तबला आणि पखवाज त्यांच्या काकांकडून आफताबुददीन खान यांच्याकडून शिकले. सुप्रसिद्ध सरोद वादक तामीर बरन आणि सुप्रसिद्ध बासरीवादक पन्नालाल घोष यांच्याकडेही शिकले त्यावेळी ते शिबपूर येथे येत असत. अन्नपूर्णा देवी कडूनही ते शास्त्रीय संगीत शिकले , पंडित रवीशंकर यांच्याबरोबरही त्यांनी कार्यक्रम केले पुढे १९४१ साली अन्नपूर्णादेवी आणि पंडित रवीशंकर यांनी विवाह केला. उस्तादजींनी जगभर कार्यक्रम केले त्यांचे विद्यार्थीही जगभर आहेत.

उस्तादजी म्हणतात ,’ तुम्ही जेव्हा १० वर्षे सर्व करता तेव्हा स्वतःला प्रसन्न करता , २० वर्षे सराव करता तेव्हा तुम्ही कार्यक्रम करून प्रेक्षकांना प्रसन्न करता. ३० वर्षे सरावानंतर तुम्ही तुमच्या गुरूला प्रसन्न करू शकता परंतु तुम्ही खूप खूप वर्षे सराव कराल तेव्हा खरे कलाकार बनता आणि मग तुम्ही ईश्वरालाही प्रसन्न करू शकता. ‘ ह्याचा खरा बोध आजकालच्या कलाकारांनी घेतला पाहिजे.

उस्तादजींना बघण्याचा आणि ऐकण्याचा योग फार वर्षांपूर्वी मुंबईत मला आला होता.

त्यांना भारत सरकारने पदमभूषण दिले आणि त्यांना ग्रॅमी अवॉर्ड देखील मिळाले होते. त्याप्रमाणे परदेशी पुरस्कारही मिळाले होते.

अशा महान वादकाचे अमेरिकेत १८ जून २००९ मध्ये निधन झाले.

— सतीश चाफेकर

Avatar
About सतिश चाफेकर 448 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..