असा उद्योगधंदा जगाच्या पाठीवर शोधुन तरी सापडेल का ?
९५२ किलो म्हणजे जवळपास टनभर कांद्याची विक्री. कांद्याला दर मिळाला प्रतिकिलो १ रुपया ६० पैशे.
९५२ किलोचे झाले १५२३ रुपये २० पैशे.
त्या १५२३ रुपये २० पैशातुन आडत ९१ रुपये ३५ पैशे,
हमाली ५९ रुपये,
भराई १८ रुपये ५५ पैशे,
तोलाई ३३ रुपये ३० पैशे आणि
मोटार भाडे १३३० रुपये
असे एकुण १५२२ रुपये २० पैशे वजा करुन
हातात मिळाला 1 रुपया.
हमाल, काट्यावाला, आडतदार, वाहतुकदार यांना रोजगार तर ग्राहकांना माफक दरात शेतीमाल उपलब्ध करुन हातात मिळालेली दमडी घेऊन तो विनातक्रार चालता झाला. एवढी दानत एखाद्या कर्तव्यदक्ष राजाकडेच असु शकते.
म्हणुनच त्याच्यासाठी शेतकरी राजा हे विशेषण वापरले जात असावे.
हें गणित धक्कादायकच आहे ! उगीच नाहीं शेतकरी मरत !
-सुभाष नाईक