फॅशन फोटोग्राफर व बॉलीवुड निर्माते अतुल कसबेकर यांचा जन्म २२ एप्रिल १९६५ रोजी मुंबई येथे झाला.
अतुल कसबेकर यांना किंगफिशर कॅलेंडर शूट साठी ओळखले जाते. अतुल कसबेकर याच्याकडे क्षमता असल्याने बारावीला उत्तम गुण मिळवून त्याने यूडीसीटी या केमिकल टेक्नॉलॉजीतील नामांकित संस्थेत प्रवेश घेतला. पण दुसऱ्या वर्षी आपल्या छायाचित्रणाच्या आवडीसाठी त्याने ते शिक्षण सोडले. व लॉस एंजल्सला फोटोग्राफीचे ट्रेनिंग घेण्यास गेले. १९९० मध्ये अतुल कसबेकर भारतात परत आल्यावर १९९१ मध्ये प्रोफेशनल फोटोग्राफर म्हणून एक स्टुडियो चालू करून आपल्या फोटोग्राफी करियरची सुरुवात केली.
२००७ मध्ये त्यांनी आपली सेलिब्रिटी मैनेजमेंट कंपनी ‘Bling’ ची सुरुवात केली. दीपिका पादुकोण पासून फरहान अख्तर पर्यत अनेक सेलिब्रिटी त्याचे क्लाइंट आहेत. २००३ ते २०१२ पर्यत अतुल कसबेकर यांनी किंगफिशर कैलेंडरसाठी फोटो शूट केले.
अतुल कसबेकर यांनी २०१६ साली ‘नीरजा’ व २०१७ साली ‘तुम्हारी सुलु ‘ हे चित्रपट निर्माण केले होते. करिअर घडवण्यासाठी दीपिका पादुकोण सर्वप्रथम मुंबईत आली होती. विशेष म्हणजे मुंबईत येण्यासाठी तिला अतुल कसबेकरनं खूपच मदत केली. तिनं एका मुलाखतीत अतुल कसबेकरचा उल्लेख करत त्याचे आभार मानले होते. ‘मी मुंबईत येण्याचा विचार पक्का केला. मी कधीही माझं घर सोडून बाहेर गेले नव्हते. माझ्या पालकांना माझी खूपच चिंता वाटत होती पण त्यावेळी अतुल कसबेकर ही पहिली व्यक्ती होती जी माझ्या पालकांशी बोलली. त्यानं माझ्या पालकांना विश्वास दिला.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply