नवीन लेखन...

फाटकी वस्त्रे अंगावरती (सुमंत उवाच – ३५)

फाटकी वस्त्रे अंगावरती
समयसूचक चमके हाती
खिशात परका दोस्त लेकाचा
उगाच वाजत रहाती

देण खरी ती पुस्तकं रुपी
मनास शांतता देई
उगाच कोणी मनास भेदूनी
कसा सुखाने राही…

अर्थ

होम quarantine झाल्यापासून सगळेच आपण आपल्याला आजूबाजूच्या भौतिक सुखाचा प्रचंड loss झालाय नाही का? काय हे mall बंद?, सिनेमॅक्स बंद, CCD बंद? हे म्हणजे अशक्यच. अल्लाउद्दीन खिलजी ने आक्रमण केल्यासारख्या वेदना होतायत आतून सर्वांना. “”कित्येक दिवस झाले, मामलेदार मिसळ नाही खाल्ली यार””, “”श्या, वाढ दिवस जवळ आलाय माझा, आणि हे काय घरी बसा, बाहेर पडू नका bull shit, मला मस्त खरेदी करायची होती यार, पण काय मॉल बंद, गोखले रोड बंद, fashion स्ट्रीट बंद काय फालतूपणा आहे यार””. पिझ्झा नाही, पावभाजी नाही, आईस्क्रीम नाही, बियर नाही, व्हिस्की नाही, नवीन कपडे नाहीत, पॉश शूज नाहीत, गॉगल नाही, परफ्युम संपलाय, चायनीज नाही, गजानन चा वडापाव नाही….. अशा अगणित तक्रारी सध्या सगळीकडे ऐकायला मिळतायत. या सगळ्या भौतिक सुखा पुढे मानसिक आणि आत्मिक आनंद आपण पूर्णपणे गमावून बसलोय असच वाटतं. मी आज काळाची गरज म्हणून घरातून बाहेर पडायचं नाहीये हे एकदा मनाला पटवले की आपोआप तुम्हाला त्या बंदीचा सुद्धा आनंद घेता येईल. मग एक महिना वरणभात, उसळी यांवर काढला तर पिझ्झा तुमची झोप स्वप्नात येऊन उडवणार आहे का? पंजाबी रोटी खाण्यापेक्षा घरी आईने केलेली तांदूळ किंवा ज्वारीची भाकरी अजूनही श्रेष्ठ आहे पण ते मनाला पटायला हवं तर त्यातलं सुख उपभोगता येईल.

सुख म्हणजे नक्की काय? एखादया गोष्टीचा हवं असताना उपभोग घेणे, मग ती भौतिक असो किंवा मानसिक असो. पण यात जर मानसिक सुख तुम्ही स्तिमित केलंत तर भौतिक सुख जरी मागे पडलं तरी त्याचा त्रास होणार नाही. आपल्या आधीची पिढी कुठे AC मधे झोपायची? त्यांना कितीही उकाडा असला तरी दुसरी सोय नव्हती पण आज आपण केवळ उपलब्ध आहे म्हणून त्याचा उपभोग घेतो त्यातलं सुख काढून घेतो पण त्याच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम लक्षात कुठे येतात?

मनाला सुखी ठेवण्यात यशस्वी झालो तर आयुश्यात भौतिक सुख तुम्ही कंट्रोल मधे ठेऊ शकाल. सुख म्हणजे केवळ खर्च करणे, चांगले दिसणे, लखलखाट करणे, पॉश रहाणे, अद्ययावत उपकरणे वापरणे (अति) याने मानसिक नाही तर शारीरिक सुख, गरज भागणे एवढे शक्य होऊ शकते पण मनाला सुखी ठेवायचे असेल तर रजो गुणावर ताबा मिळवणे फार गरजेचे आहे. म्हणून भौतिक सुखा पेक्षा मानसिक सुख हे नेहमी श्रेष्ठ असते.

मन खंबीर ज्याचे तो सुखी निजतो, भौतिक सुखाचा जो भक्त तो निशाचर होतो.

— सुमंत परचुरे.

सुमंत जयंत परचुरे.
About सुमंत जयंत परचुरे. 146 Articles
व्यवसाय- ऋतू फूड्स - विविध प्रकारचे फूड प्रॉडक्ट्स उत्पादन. शिक्षण- हॉटेल मॅनेजमेंट. छंद- गेली 27 वर्षे सहयाद्री मधे भटकंती, 200 हुन किल्ले भटकंती पूर्ण. काव्य लेखन, कथा लेखन, प्रवास वर्णनं लेखन करणे. " Bharpet " नावाने youtube चॅनल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..