पांडेजी बसले पंगतीला
चेलेही होते संगतीला
खाउन भरपुर पांडेजींनी
ग्लास ग्लास रिचवले पाणी .
‘आता भरपेट जेवणार कसे? ’
एक चेला त्यांना पुसे.
‘पाणी शिंपडल्याने वरती
खाली दबली जाते माती.
तसेच पाणी पिऊन घडते
दबते जेवण, जागा होते.
आता पहा रिचवीन भराभर
ताटातिल भाताचे डोंगर’.
-सुभाष स. नाईक