नवीन लेखन...

फॅक्स मशीन

आजच्या संगणकाच्या युगातही जे जुने तंत्रज्ञान अजूनही टिकून आहे ते म्हणजे फॅक्स मशिन. ॲलेक्झांडर ग्रॅहम बेलने १८७६ मध्ये मिस्टर वॉटसन, कम हियर आय वाँट टू सी यू हे शब्द टेलिफोनवर उच्चारले, तेव्हा तो दूरसंचार क्रांतीचा पितामहच ठरला. नंतरच्या काळात याच तंत्रज्ञानाचे अनेक आविष्कार आपण पाहिले. त्यानंतर अॅलेक्झांडर बेन्स याने पहिले केमिकल टेलिग्राफ यंत्र तयार केले होते. उच्चारलेले शब्द जसे दुसरीकडे जातात तसे एखाद्या लिहिलेल्या मजकुराची प्रतिमाच दुसरीकडे पाठवता येणार नाही, अशी कल्पना त्यात होती.

फॅक्स मशिनचे पहिले पेटंट हे फोनच्याही आधी म्हणजे १८४० मध्ये घेण्यात आले होते असे सांगितले जाते. अत्यंत कमी वेळात एखाद्या कागदावरील मजकूर एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठवण्याची फॅक्सिमिलीसारखी व्यवस्था फारच उपयोगी व तुलनेने कमी खर्चाची आहे. फॅक्स मशिनमध्ये जेव्हा कागद सरकवला जातो तेव्हा त्याची प्रकाशीय प्रतिमा तयार केली जाते त्याला ऑप्टिकल स्कॅनिंग असे म्हटले जाते. या प्रक्रियेनंतर मजकुराचे रूपांतर व्हिडिओ आधारित बॅन्ड सिग्नलमध्ये केले जाते. ज्या प्रकारची संदेशवहन यंत्रणा असेल त्यानुसार व्हिडिओ सिग्नलचे एनकोडिंग केले जाते.

त्यात जर बीटस कमी असतील तर फॅक्स चटकन दुसरीकडे जातो जर बीटस जास्त असतील तर फॅक्स जायला वेळ लागतो. एनकोडिंगमुळे बीटसची संख्या कमी केली जाते. जेव्हा संदेशाचे प्रक्षेपण हे दूरध्वनीमार्फत करायचे असते तेव्हा त्याचे रूपांतर डिजिटल संदेशातून लहरींच्या रूपातील ॲनलॉग संदेशात केले जाते, त्यालाच आपण मॉड्युलेशनचे तंत्र म्हणतो. मॉड्युलेटेड संदेश दुसऱ्या व्यक्तीच्या फॅक्स यंत्रापर्यंत पोहोचताच त्याचे डिकोडिंग केले जाते व मजकूर पुन्हा मूळ स्वरूपात दिसू लागतो. आता फॅक्स मशिन्स स्वयंचलित स्वरूपातही आहेत. व्यक्तीच्या मदतीशिवाय ते एखाद्या मजकुराचे प्रक्षेपण करू शकतात. कागदाचा आकार केवढाही असला तरी तो योग्य प्रमाणात बसवण्याची सोय आहे. मजकूर साठवून ठेवण्याची व तो हवा त्यावेळी पाठवण्याची सोय यात आहे. फॅक्स मशिनमध्ये प्रकार आहेत. ग्रुप एकच्या मशिनचा वेग एकदम कमी म्हणजे सहा मिनिटाला एक पान एवढा असतो, ग्रुप-२ मशिन तीन मिनिटाला एक पान पाठवते तर ग्रुप-३ मशिन मिनिटाला एक पान पाठवते. तुमचे मशिन कितीही वेगवान असले तरी पलीकडील ज्या मशिनवर तो फॅक्स पाठवला जाणार आहे त्याचा वेग कमी असेल तर या सगळ्या प्रक्रियेचा वेग कमी होतो.

फॅक्स करताना कागद मशिनमध्ये सरकवून ज्या नंबरला पाठवायचा तो डायल केला जातो व दुसऱ्या मशिनच्या उत्तराची वाट पाहिली जाते नंतर स्टार्ट बटन दाबले जाते. दुसरीकडचे मशिन ऑटो मोडवर असते त्यामुळे अलगद फॅक्स बाहेर येतो. फॅक्सने मजकूर पाठवताना इंटरनेटपेक्षा जास्त वेळ लागतो, त्यासाठी वापरला जाणारा कागदही महाग असतो. कालांतराने फॅक्स कागदावरचा मजकूर पुसलाही जातो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..