नवीन लेखन...

फायदेशीर काय? धंद्याच्या सुरुवातीला भांडवल जास्त असणं का कमी असणं?

एकदा एक युवक एका उद्योगपतीला भेटला आणि त्यांना म्हणाला ‘मला धंदा करायचा आहे. पण माझा खिसा रिकामा आहे मला तुमचं मार्गदर्शन हवं आहे’.

तो उद्योगपती त्याला म्हणाला, ‘तुझा खिसा रिकामा आहे याची तू चिंता करुच नकोस. तुझं डोकं अथवा हृदय रिकामं असेल तर तो मात्र चिंतेचा विषय ठरेल. भांडवलाच्या अभावी तू  नेहमी मागेच राहशील तुला सफल होता येणार नाही असं समजू नकोस. तू तुझा पुरुषार्थ सुरु कर. पैशाचा प्रश्न आपोआपच सुटेल.’

त्या उद्योगपतीचं प्रतिपादन काही वाचकांना पटणार काहींना पटणार नाही. पण उद्योगविश्वातील ही एक वास्तविकता आहे की, बहुसंख्य लोकांच्या प्रयत्नांची सुरुवात अत्यंत लहान पायावर आणि खालच्या स्थानावरूनच झालेली होती. भांडवलाचा प्रश्न सुरुवातीच्या काळात त्यांनाही आड येत होता. उद्योगविश्वातील एक अनुभवसिद्ध म्हण आहे की, ‘पहिले एक लाख रुपये कमवायला तुम्हाला चिकार संघर्ष करावा लागतो. पण एकदा का तो टप्पा तुम्ही पार पाडलात म्हणजे तुमचा पैशाचा प्रश्न हळू हळू सुटायला लागतो. प्रथम कमावलेल्या एक लाख रुपयाचे दोन लाख आणि दोन लाखांचे चार लाख त्या तुलनेत लवकर होतात.’

आता याउलट तुम्ही नव्याने एखादा उद्योग सुरू करताना तुमच्याजवळ आवश्यक ते भांडवल अपुर्‍या प्रमाणात असेल तर ते तुम्हाला फायद्याचं ठरणार नाही. त्याचं कारण असं की, तुमचा पेला पाण्यानं काठोकाठ भरलेला असतो तेव्हा पेला उचलताना अतिशय काळजी घ्यावी लागते.परदेशात ‘लोहिया’ नावाची एक कंपनी स्थापन झाली. त्यांच्याजवळ चिकार भांडवल होतं. पैशाची चिंता नव्हती. त्याचा परिणाम काय झाला? त्याचा मालकवर्ग गृहीत धरून चालला की, आपल्याजवळ इतकं भांडवल आहे आपल्याला कसली चिंता आहे? भांडवलाच्या बळावर आपण सफल होणारच. ही समजूत त्यांना महागात पडली. त्यामुळेच त्यांची गफलत झाली आणि थोड्याच काळात ती कंपनी साफ झाली ह्या कंपनीने हाताशी असलेल्या रोख भांडवलामुळे कोणत्या  चुका कशा झाल्या त्या बाबतच्या बर्याच कहाण्या माझ्या वाचनात आल्या होत्या. त्यांच्या आठवणी अजून मनात रेंगाळत असतात.

गरजेपेक्षा जास्त भांडवल माणसाला कसं गैरमार्गाला लावतं ह्याचं ती कंपनी एक उत्तम उदाहरण होतं. आता ह्याच्या उलट असा दृष्टांत पाहू. एकदा उद्योगपती आपले सुरुवातीच्या काळातले अनुभव सांगत होते. ते म्हणाले त्या काळी मी पैशाच्या बाबतीत अगदी कंगाल होत. माझी पॅन्ट बैठकीच्या जागी अगदी फाटलेली होती. माझ्या मांडीखाली रुपयाचा शिक्का असला तर वरची बाजू छाप आहे का काटा तेही मला स्पष्टपणे दिसत असे. पण पैसे नसल्यामुळे एक गोष्ट हमखास घडत असे, ती म्हणजे माझे विचार स्पष्ट असत आणि मी नेहमी सावध राहत असे.’धंद्यात अथवा व्यवसायात सफल होण्यासाठी पैसा असलाच पाहिजे हे अनिवार्य नाही.

एका पाहणीत असं निदर्शनास आलं की, अमेरिकेत जे उद्योगपती, उद्योजक होते त्यातले दहापैकी नऊ जणांची सुरुवात अगदी निर्धन अवस्थेत झालेली होती. त्या गरिबीचे चटके सोसल्यामुळे त्यांचया मनात एक दुर्दम्य महत्वाकांक्षा प्रज्वलित झाली होती की ह्या गरिबीचं निर्मूलन कतायचंच. आणी ही दुर्दम्य महत्वाकांक्षा यशाच्या शिखराकडे घेऊन गेली होती.

काही लोक वारंवार असं ठाम प्रतिपादन करतात की, ह्या जगात पैशाशिवाय काही होत नाही. पैशामुळेच सर्व गोष्टी होतात. अशा लोकांचं एक लक्षण स्पष्ट होतं त्यांच्याजवळ पैसा तर नाहीच पण यश मिळवण्याची ज्वलंत महत्वाकांक्षाही नाही.

सारांश कारकीर्दीच्या प्रारंभी मजबूत आर्थिक स्थितीपेक्षा, भांडवलाची कमतरता आणि पैशाची चणचणच तुम्हाला उपकारक ठरते.

 

Avatar
About Guest Author 525 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..