नवीन लेखन...

प्राचीन बांधकामाची वैशिष्ट्ये

राजवाडे, किल्ले, गढ्या, गोदामे, बंधारे ही प्राचीन बांधकामे होत. ही सर्व बांधकामे दगडी होती. खडकाळ भागांत खडक सुरुंगाने फोडून त्याचे तीस सें.मी. ते एक मीटर आकाराचे दगड काढण्यात येत. छिन्नी हातोड्याने दगड घडवून त्यांचे घनाकृती किंवा लंबघनाकृती आकार करून ते एकावर एक रचून भिंती बांधण्यात येत असत.

सांधे भरण्यासाठी चुना, 14 कुतूहल चिकणमाती यांचा वापर करण्यात येई. वरचा दगड खालच्या चिऱ्यापासून वेगळा होऊ नये म्हणून त्या वेळी एक विशिष्ट तंत्र वापरले जात असे. खालच्या चिऱ्याच्या वरच्या पृष्ठभागी मधोमध चौकोनी अथवा षटकोनी भोक पाडण्यात येत असे. ते सुमारे ७५ मिलिमीटर खोल ठेवून, त्याच आकाराचे भोक न्त्यावरील चिऱ्याच्या खालच्या पृष्ठभागाला पाडले जाई. खालच्या चिऱ्याच्या भोकात लोखंडाची दांडी घट्ट बसवून तिचा काही भाग पृष्ठभागावर ठेवला जाई. वरील चिरा ठेवण्यापूर्वी चुना-वाळू मिश्रण पसरून तो बरोबर त्या दांडीवर बसेल अशा तऱ्हेने ठेवला जाई.

यामुळे चिरा सरकण्यास प्रतिबंध होई. अशा तऱ्हेच्या खाचा जवळजवळ असणाऱ्या चिऱ्यांच्या उभ्या पृष्ठभागावर केल्या जाऊन तयार झालेल्या भोकात वितळविलेले शिसे ओतण्यात येई. अशा तऱ्हेने सर्व चिरे एकमेकांशी जोडले जाऊन बांधकाम मजबूत केले जाई. दरवाजे, खिडक्यांच्या वरच्या भागात दगडी कमान केली जाई. त्याचे दगड वर जास्त व खाली कमी असे निमुळते असल्यामुळे प्रत्येक चिरा आपल्या जागी चपखल बसतो. पूर्वीचे सगळे किल्ले, राजवाडे, गढ्या, काही इमारती, पूल, दगडी बांधकामाचे होते. कालांतराने दगड काढणे, वाहून नेणे हे खर्चाचे काम होऊन बसले. पूर्वी भिंतीची जाडी ६५ सें.मी. ते एक मीटर असे. आता जागा वाचविण्यासाठी २२ सें.मी. ते ३० सें.मी. जाडीच्या विटांच्या भिंती बांधण्यात येतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..