१० फेब्रुवारी १९४७ रोजि अल्बर्ट नेक्सन हॉर्न्बि या इंग्लिश क्रिकेटपटुचा जन्म लँकेशायर परगण्यात झाला. “मंकि” या टोपणनावाने तो विख्यात असला तरि त्याच्या क्रिडाकाळात सहकारि खेळाडु त्याला “बॉस” म्हणुन पुकारत असत.
विसाव्या वर्षि प्रथमश्रेणित पदार्पण केलेल्या मंकिने विस वर्षे लँकेशायरचे नेतृत्व केले. डिक बार्लो आणि मंकि हॉर्न्बि हि लँकेशायरचि त्या काळातिल सलामिचि जोडि प्रचन्ड लोकप्रिय आणि बर्याच अंशि यशस्वि ठर्लि. अल्बर्ट हा मुळात आक्रमक खेळाडु होता तर बार्लोला बचावाचि भिन्त उभि करायला आव्डे.
४३७ प्रथमश्रेणि साम्न्यांमधुन १६,१०९ धावा मंकिने काढल्या. त्यात ७५ अर्धशत्के आणि १६ शत्के होती. १८८ धावान्चा डाव हा त्याचा उच्चांकि डाव ठर्ला. ३१३ झेल आणि ३ विटिचित (स्टम्प्ड) हि त्याचि क्षेत्ररक्षणातिल कामगिरि.
मंकिच्या वाट्याला तिन कसोट्या आल्या आणि सहा डावांमधुन तो अव्घ्या एक्विस धावाच जम्वु शक्ला. नऊ धावा हि त्याचि सर्वोत्तम काम्गिरी.
मंकिच्या कसोटि कार्किर्दिचा सर्वात मनोरंजक भाग असा कि त्याच्या गोलन्दाजिचि सरासरि “शुन्य” एव्ढी आहे ! गोलन्दाजाचि सरासरि अर्थात एक बळि मिळव्ण्यासाठि त्याला मोजाव्या लाग्लेल्या सरासरि धावा. मंकिने त्याच्या कार्किर्दित एकहि धाव न देता एक गडि बाद केला होता ! पदार्पणाच्या कसोटितच मंकिने फ्रान्सिस अॅलन या ऑस्ट्रेलियाच्या फलन्दाजाला वैयक्तिक पाच धावांवर परतवले होते. कसोट्यांमध्ये त्याने या एकाच डावात गोलन्दाजि केलि. त्याचे पृथक्करण होते : ७ बाजुबदल – सातहि निर्धाव – एक बळि. (या साम्न्यात प्रत्येक चार वैध चेन्डुंनन्तर बाजुबदल केला गेलेला होता. तेव्हा मंकिने टाक्लेले एकुण चेन्डु अठ्ठाविसच.)
कसोट्यांमध्ये आज्वर २६२१ पुरुषांनि गोलन्दाजि केलेलि आहे आणि त्यापैकि केवळ तिघान्नाच कार्किर्दित शुन्य धावेची सरासरि राखता आलेलि आहे. पहिला आहे इंग्लन्डचा विल्फ बार्बर. याचि कार्किर्द दोन कसोट्यान्चि होति आणि एका डावात दोन चेन्डु टाक्ताना त्याने एक बळि मिळव्ला – एकहि धाव न देता. दुसरा मंकि आणि तिस्रा न्युझिलन्डचा ब्रुस मरे. याने तेरा कसोट्यांमधुन सहा चेन्डु टाक्ले आणि एक गडि बाद केला.
अर्थात या तिघान्मध्ये उज्वा ठर्तो तो मंकिच. त्याने तब्बल २८ चेन्डुंवर धाव दिलि नव्हति !
ट्रेवर बेलि काळाच्या पडद्याआड
१९४९ ते १९५९ या काळात इंग्लन्ड संघाकडुन ६१ कसोट्या खेळलेले आणि आप्ल्या चिवट फलन्दाजिमुळे “बाऽनकल” (समुद्रात खडकान्ना किंवा जहाजाच्या तळांना चिक्टुन राहणारा एक जलचर) म्हणुन ओळख्ले जाणारे ट्रेवर बेलि १० फेब्रुवारि २०११ रोजि ग्रिन्विच मिन टाईमनुसार सकाळी सहा वाज्ता एसेक्समधिक त्यान्च्या राहत्या घराच्या किचनमध्ये मृतावस्थेत सापड्ले. (वॉट अ मीऽऽन टाईम) आगिमुळे ते मृत्यु पाव्ल्याचा प्राथमिक अन्दाज आहे.
मंकिच्या कसोटि कार्किर्दिचा सर्वात मनोरंजक भाग असा कि त्याच्या गोलन्दाजिचि सरासरि “शुन्य” एव्ढी आहे ! गोलन्दाजाचि सरासरि अर्थात एक बळि मिळव्ण्यासाठि त्याला मोजाव्या लाग्लेल्या सरासरि धावा. मंकिने त्याच्या कार्किर्दित एकहि धाव न देता एक गडि बाद केला होता !
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply