नवीन लेखन...

फेब्रुवारी ११ : विश्वचषक २००३ – कॅनडाचा विजय आणि शेन वॉर्नचे ड्रग स्कॅन्डल

११ फेब्रुवारी २००३ रोजि डर्बनमधिल किंग्जमिडवर २००३ च्या विश्वचषकाचा बांग्लादेश विरुद्ध कॅनडा हा साम्ना झाला. हा साम्ना दिवसरात्रिचा होता.कॅनडाच्या संघाचा हा पहिलावहिला एक्दिवसीय सामना होता. (योगायोग म्हण्जे १० फेब्रुवारि रोजि म्हण्जे आद्ल्याच दिवशि नामिबियाने झिम्बाब्वेविरुद्ध खेळुन आंतर्राष्ट्रिय पदार्पण केले होते. सलग दोन दिवसांमध्ये दोन संघांनि आंतर्राष्ट्रिय पदार्पण केल्याची हि पहिलिच वेळ असावि.)जो हॅरिस (कॅनेडिअन कप्तान) नाणेकौल जिंक्ला आणि फलन्दाजि स्विकार्लि. ४९.१ षट्कांमध्ये १८० धावांवर कॅनडाचा डाव सम्पुष्टात आला. इअन बिल्क्लिफ्ने ४२ धावा काढल्या तर डेस्मन्ड चम्निने २८. बांग्लादेशाकडुन सहा गोलन्दाजान्नि गोलन्दाजि केलि आणि प्रत्येकाला किमान एक बळि मिळाला.सहाच षट्कांमध्ये ३३ धावा तड्कावुन बांग्लादेशाने दम्दार सुर्वात केलि. त्या धावसंख्येवर अल शहरियार बाद झाला. मग ४४ आणि ४६ च्या सांघिक धावसंख्येवर दुस्रा आणि तिस्रा गडि बाद झाला. इनामुल हक आणि सान्वर होसैनने मग ३० धावान्चि भागिदारि केलि. संघाच्या ७६ धावांवर हक बाद झाला आणि आणखि तिस धावांनन्तर सान्वर होसैन बाद झाला. २०.५ षटकांनन्तर बांग्लादेशाची दशा पाच बाद १०६ अशि झालि आणि खळबळ उडालि…अखेर नव्ख्या कॅनडाने बरोब्बर २८ षट्कांमध्ये बांग्लादेशाचा ‘टका’ उडव्ला. ऑस्टिन कॉड्रिंग्टनने नऊ षट्कांमध्ये अव्घ्या २७ धावा देताना पाच गडि बाद केले. सन्जयन थुराइसिंगमचा (याला एकच बळि मिळाला) अपवाद वगळ्ता इतर तिघा कॅनेडिअन गोलन्दाजान्ना किमान दोन बळि मिळाले. हन्नन सर्कार आणि सान्वर होसैन यान्नी प्रत्येकि पंच्विस धावा काढल्या.विश्वचषकाच्या तोवरच्या चोविस वर्षांच्या इतिहासात कधिहि एखाद्या कसोटिदर्जा अस्लेल्या राष्ट्राला तसा दर्जा नस्लेल्या राष्ट्राने पराभु केल
नव्हते. कॅनडाच्या संघाने ही स्पृहणिय काम्गिरि केलि, तिहि पहिल्यावहिल्या साम्न्यातच. याने खळबळ उडणे स्वाभाविकच होते पण दिव्साचि ब्रेकिंग न्युज भल्तिच होति…

याच दिव्शि जोहान्स्बर्गमध्ये विद्यमान (आणि तत्कालिनहि) विजेत्या ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध साम्ना

खेळुन आप्ल्या अभियानास प्रारम्भ केला होता. ह्या साम्न्याच्या प्रारम्भापुर्विच ऑस्ट्रेलियाचा स्टार फिर्किपटु विश्वचषकातुन बाद झाला होता.ऑस्ट्रेलियात नुक्त्याच झालेल्या एक्दिव्सिय मालिकेदर्म्यान शेन वॉर्नने बम्दि घात्लेले एक औषध वापर्ल्याचे उघड झाल्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याच्यावर एका वर्षाचि बन्दि घात्लि. वैद्यकिय संज्ञाविश्वातिल ‘डायुरेटिक’ नावाच्या औषध-गटातिल एक औषध वॉर्निने घेत्ल्याचे त्याच्या मुत्र-तपासणित निष्पन्न झाले होते. डायुरेटिक गटातिल औषधे अधिकाधिक मुत्र शरिराबाहेर टाक्ण्यास मदत कर्तात. त्यामुळे खेळाडुला चटकन वजन घटविण्यास मदत मिळु शकते तसेच मुत्रामध्ये विर्घळु शक्णार्‍या औषधांचे पुरावे तो झटकन शरिराबाहेर काढु शक्तो. अशा गोळ्या इतर गोळ्यान्चे पुरावे लप्वु शकत असल्यानेच क्रिडापटुंकडुन त्यान्च्या वापरावर बन्दि घाल्ण्यात आलेलि आहे.आधि आप्ल्या आईने ति गोळि ‘छान दिस्ण्यासाठि’ दिलेलि होति असे वॉर्नी म्हणाला. नन्तर मात्र त्याने अशा दोन गोळ्या घेत्ल्याचे उघड झाले. शेन वॉर्न आणि त्याचि आई या दोघांच्याहि साक्षि याबाबत विश्वास ठेवण्यासारख्या नाहित, असे सन्माननिय न्यायाधिशान्नि निकालात म्हट्ले होते.

आधि बुकिंकडुन पैसे घेत्ल्याचे उघड झाल्याने वॉर्निला बन्दिचि शिक्षा भोगावि लाग्लि होति. नन्तर काहि परिचारिकांनि त्याच्यावर लैंगिक छळाचे आरोप केलेले होते. या दोहों आरोपांमध्ये तथ्य नक्किच होते. आता ‘एका गोळिचे महाभारत’ त्याला महाग पड्ले. पुढे प्रेमिकेला पाठवायचा एसएमएस चुकुन बाय्कोला पाठव्ल्याने त्याचा विवाहहि संपूष्टात आला.

अस्ल्या कारस्थानांमुळेच तो स्पर्धेत मागे पड्ला आणि ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व कर्णारा कल्पक वॉर्न जगाला पहावयास मिळाला नाही. अर्थात त्याचि काहिशि कसर आयपिएल्ने भरून काढ्लि. आयपिएल्च्या मोज्क्या अत्यन्त चांगल्या परिणामान्मध्ये आम्ही या घटनेचि गणति कर्तो.

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..