<१९९२ : अँडी फ्लॉवरचे दणदणित पदार्पण(सामन्याचा>एकदिवसिय पदार्पणच विश्वचषकाच्या सामन्यात आणी त्या सामन्यातच शतक असा कुण्याही क्रिकेटपटुला हेवा वाटण्यासारखा प्रसंग पृथ्वितलावरच्या केवळ एका पुरुषाच्या वाट्याला आलेला आहे : अँड्र्यू किंवा अँडी फ्लॉवर हे त्याचं नाव.
दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या अँडिने आपल्या एकदिवसिय कारकिर्दिचा श्रिगणेशा केला विश्वचषकाच्या सामन्यात सलामिला येऊन पुर्ण पन्नास षटके खेळपट्टिवर उभे राहत नाबाद ११५ धावा काढुन (१५२ चेंडू, ८ चौकार, १ षटकार, सामनाविर) ! श्रिलंकेचा कर्णधार अरविंद डिसिल्वाने नाणेकौल जिंकुन फलंदाजी स्विकारण्याचा निर्णय घेतला होता आणी झिम्मिंनी निर्धारित पन्नास षटकांमध्ये चारच गडी गमावुन ३१२ धावा कुटल्या होत्या.
हा जयसुरिया-कालुविथर्नाने एदिसांच्या प्रारम्भांमध्ये क्रांतिकारी परिवर्तने आणण्याआधिचा काळ होता. जयसुरिया हा तेंडुलकर, ब्रेंडन मॅक्कलम आणी अगदी कालच्या सामन्यापर्यंतच्या केविन पिटर्सनप्रमाणेच कारकिर्दिच्या सुरुवातिला मधल्या फळित फलंदाजी करित असे. तेव्हा इतक्या धावा करणे ही श्रिलंकेसाठी सोपी गोष्ट नक्कीच नव्हती.
या सामन्यात धावांची रेलचेल होती. कोरडी ठणठणित खेळपट्टी आणी छोट्या सिमांमुळे फलंदाजांना मदतच झाली. श्रिलंकेने अखेर हा सामना चार चेंडू व तिन गडी राखुन जिंकला. अतुला समरशेखराच्या (सलामिविर) केवळ ६१ चेंडुंमधिल ७५ धावाव अर्जुन रणतुंगाच्या तितक्याच चेंडुंमधिल नाबाद ८८ धावा यांची श्रिलंकेला मुख्य मदत झाली. एदिसांमध्ये दुसर्या डावात फलंदाजी करणार्या संघाने ३०० धावांचा पल्ला गाठण्याची इतिहासातिल ही पहिलिच वेळ होती !
विश्वचषकातिल पदार्पणाच्या सामन्यात शतक : आजवर तेरा खेळाडुंना असा पराक्रम करता आलेला आहे. भारताकडुन केवळ एकाच खेळाडुला हे जमलेले आहे आणी जागतिक यादित त्याचा क्रमांक तेरावा आहे – विराट कोहली.<२००३ : जॉन डेविसनचे घणाघाती शतक(सामन्याचा>
२००३ च्या विश्वचषकाचा २४ वा सामना. कॅनडा वि. वेस्ट इंडिज. मैदान – सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरिअन.)
नाणेकौल हरुनही फलंदाजिचे मिळालेले आमंत्रण कॅनडाच्या जॉन डेविसन या सलामिविराला फारच आवडलेले दिसले. वेस्ट इंडिजच्या मार्यावर तुटुन पडताना कॅनेडिअन सलामिविर जॉन डेविसनने ३० चेंडुंमध्ये वैयक्तिक अर्धशतक गाठले आणी आणखी ३७ चेंडुंवर त्याने वैयक्तिक शतक पुर्ण केले. ६७ चेंडू, ७ चौकार, ६ षटकार ! विश्वचषकाच्या तोवरच्या इतिहासातिल हे सर्वात वेगवान शतक होते. अखेर डेविसन ९८ चेंडुंमध्ये १११ धावा फटकावुन बाद झाला. डेविसन बाद झाला तेव्हा २२ षटके व एका चेंडुचा खेळ झालेला होता आणी कॅनडाच्या १५६ धावा झालेल्या होत्या. त्यानंतर मात्र कॅनडाच्या डावाला ‘ड्रेक’ची लागण झाली आणी त्रेचाळिसाव्या षटकात २०२ धावांवर त्यांचा डाव सम्पुष्टात आला. वॅस्बर्ट ड्रेक्स ९.५-१-४४-५.
विंडिजने सामना जिंकला हे सांगायला नकोच पण २०३ धावा गाठण्यासाठी पाच वेस्ट इंडियनांना खेळावे लागले आणी केवळ १२३ चेंडुंमध्ये वेस्ट इंडिजने २०६ धावा तडकावल्या हे सांगितलेच पाहिजे ! ब्रायन लाराने ४० कंदुकांवर ८ चौकार व ५ षटकार आरेखित ७३ धावा या डावात काढल्या.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply