१९६० साली प्रदर्शित झालेल्या ‘दीदी’ या चित्रपटाने त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांचा जन्म २५ सप्टेंबर १९३९ रोजी बंगलोर येथे झाला. १९६२ साली प्रदर्शित झालेल्या ‘टारझन गोज टू इंडिया’ या इंग्रजी चित्रपटातही त्यांनी व्यक्तिरेखा साकारली होती. १९६५ साली प्रदर्शित झालेला ‘ऊँचे लोग’ हा चित्रपट त्यांचा पहिला ‘हिट’ चित्रपट ठरला. त्यानंतर आलेल्या ‘आरजू’ या चित्रपटातील भूमिकेने त्यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील स्थान पक्के केले आणि सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेसाठी फिरोझ खान यांना पसंती देण्यात येऊ लागली.
‘आदमी और इन्सान’मधील भूमिकेसाठी त्यांना पहिला सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्यांची निर्मिती व दिग्दर्शन असलेल्या ‘धर्मात्मा’ या १९७५ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला खूप लोकप्रियता लाभली. सत्तर-ऐंशीच्या दशकात फिरोझ खान यांचा चाहतावर्ग तयार झाला. त्यांनी दिग्दर्शित केलेले ‘कुर्बानी’, ‘जाँबाज’ आणि ‘दयावान’ हे चित्रपटही हीट ठरले. १९९२ साली दिग्दर्शित केलेल्या ‘यल्गार’नंतर फिरोझ खान चित्रपटसृष्टीपासून दूर गेले होते. मा.फिरोझ खान यांनी पन्नासहून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या. त्या काळात फिरोज खान आणि मुमताज यांची जोडी खूप लोकप्रिय झाली होती. मैत्रीसोबतचे दोघे व्याहीसुध्दा होते.
२००५ मध्ये फिरोज यांचा मुलगा फरदीनने मुमताज यांची मुलगी आणि बालपणीची मैत्रीण नताशासोबत लग्न केले. पुत्र फरदीन खानला ‘लॉँच’ करण्यासाठी १९९८ साली ‘प्रेम अगन’ या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसे यश लाभले नाही. २००३ साली त्यांनी फरदीनलाच घेऊन ‘जाँनशीन’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. याच चित्रपटाद्वारे त्यांनी मोठय़ा पडद्यावर पुनरागमन केले. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘वेलकम’ या चित्रपटात त्यांनी साकारलेली ‘आरडीएक्स’ची भूमिका लोकप्रिय झाली होती. मा.फिरोझ खान यांचे २७ एप्रिल २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply