चित्रपट कथा – पटकथाकार आणि संवाद लेखक यशवंत रांजणकर यां जन्म १९३३ साली झाला.
यशवंत रांजणकर यांनी बँकेत नोकरी केली; तसेच मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे ग्रंथपाल म्हणूनही काम केले. त्यानंतर त्यांनी वृत्तपत्रांमध्ये काम करण्यास सुरु त्यांनी ‘हंस’, ‘मोहिनी या दिवाळी अंकांमधून लेखन केले. २०१९ मध्ये ‘हंस’ दिवाळी अंकासाठी त्यांनी संशोधनात्मक मोठा लेख लिहिला होता.
चित्रपट विषयक साप्ताहिक चित्ररंग चे रांजणकर हे काही काळ कार्यकारी संपादक होते. त्यांची पन्नास हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. बैरागपाडा हे पुस्तक तसेच लॉरेन्स ऑफ अरेबिया, आल्फ्रेड हिचकॉक, वॉल्ट डिस्नी – द अल्टिमेट फँटसी यांची त्यांनी लिहिलेली चरित्र वाचकप्रिय ठरली. रांजणकरांची शैली वाचक-स्नेही होती. लॉरेन्स ऑफ अरेबिया या पुस्तकाने मराठी वाचकविश्वाला सर्वस्वी अपरिचित असलेल्या टी. ई. लॉरेन्सचं हे चरित्र त्यामुळे अथपासून इतिपर्यंत वाचनीय झाली.
यशवंत रांजणकर यांच्या अपूर्व चित्रलेणी, व ‘वॉल्ट डिस्ने यांचे चरित्र’ या पुस्तकांना पुरस्कार मिळाले होते. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक चित्रप्टासाठी कथा, पटकथा आणि संवाद लेखन केले होते. सर्जा, धाकटी सून या चित्रपटांची पटकथा त्यांनी लिहिली होती. त्यांनी लिहिलेले ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’,‘कशासाठी प्रेमासाठी’हे चित्रपटही गाजले. ‘अर्धागी’ चित्रपटाच्या पटकथेसाठी त्यांना राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. रांजणकर यांनी ‘धाकटी सून’, ‘आई पाहिजे’ अशा दहा ते बारा चित्रपटाच्या पटकथा, संवाद लेखन केले होते. तसेच त्यांचे भव्य नाटक ‘गर्भ श्रीमंत’हे खूप गाजले होते.
यशवंत रांजणकर यांचे १५ जून २०२० रोजी निधन झाले.
Leave a Reply