नवीन लेखन...

आपल्या विचारांमधील अध्यात्माचा शोध !

आपल्यापेक्षा उच्च पातळीवर असलेल्या कशाहीबद्दल जेव्हा आपण बोलत असतो, तेव्हा नैसर्गिकपणे आपण गृहीत धरलेले असते- ते काहीतरी गुह्य,गूढ असते आणि कदाचित अज्ञातात (आपल्या आकलनाच्या परिघापलीकडे) अस्तित्वात असू शकेल, जेथे आपले विचार पोहोचू शकत नाहीत. कदाचित म्हणूनच आपल्याला अध्यात्माचे आकर्षण वाटत असेल. ती जादू अथवा महान शक्ती ( आपल्या आवाक्याच्या बाहेर) असावी असं आपल्याला वाटते. पण ज्यांचा फक्त मानवी प्रयत्नांवर विश्वास असतो त्यांना कदाचित त्या गूढ संकल्पनेवर विश्वास ठेवणे अवघड जात असेल.

इथे आकर्षणाचा सिद्धांत (Law of Attraction) प्रगटतो.

आयुष्यातील महाकाय बदल अनुभवताना हा सिद्धांत निव्वळ चेटूक अथवा भुताटकी वाटू शकतो. पण त्याची मूळे प्रत्यक्षात विचारांमध्ये रोवलेली असतात. जेव्हा आपण प्रेमभावनेकडे नजर टाकतो आणि जेव्हा सर्वदूर त्याच्या अभावाचा प्रत्यय येतो तेव्हा निखळ विचारांपर्यंत ती मूळे खोलवर जातात.

स्वतःच्या आयुष्याचे आपणच निर्माते असतो (“तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार”- सदगुरु वामनराव पै ). इतरांबाबत जे घडते, ती संपूर्णपणे त्यांची निर्मिती असते. आपण इतरांच्या आयुष्यात ढवळाढवळ करू शकत नाही.आणि इतरांनाही आपल्या आयुष्यात तसे करू देत नाही. आकर्षणाच्या सिद्धांतानुसार प्रत्येकाचे जीवन निर्माण होत असते.

समुदायाच्या पातळीवर आपण आलो की आपण सगळे मिळून घटना तयार करीत असतो.

आपल्या विचारांमधील अध्यात्माचा शोध सुरु करण्यापूर्वी खालील प्रश्न स्वतःला विचारणे आवश्यक असते-

१) सत्य आणि कल्पना यांच्यातील फरकाकडे बारकाईने बघा. कोणत्या अनावश्यक कथा तुम्ही स्वतःला सांगत असता?

२) ऱ्होण्डा म्हणतो- ” आपण निखळ प्रेम आणि प्रकाश असतो फक्त ! बाकी सारे झूट असते.”

३) स्वतःच्या अहंभावाची सवडीने आणि मनमोकळेपणे भेट घ्या. त्याची कहाणी काळजीपूर्वक ऐका. त्याला कशाची गरज आहे, याचा शोध घ्या.

४) स्वतःवर करुणेने आणि सहृदयतेने प्रेम करा. अधिक दयाळू, हळूवारपणे स्वतःला जोजवा. जिवलगांसारख्या स्वतःशी गप्पा मारा.

आयुष्याचे संपूर्ण रंग धीटपणे न्याहाळत, त्याच्या बदलत्या सौंदर्याशी एकरूप व्हा.

याला अद्वैत म्हणतात.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..