नवीन लेखन...

डीएनएचे ठसे

पूर्ण जीवसृष्टीची ही डीएनएची गाथा लिहिली जाते ती फक्त ४ मुळाक्षरांनी (A, T, G, C). पण आपल्या साहित्यसृष्टीत फक्त ३६ मराठी मुळाक्षरांनी लिहिलेले प्रत्येक पुस्तक वेगळे असते तशीच प्रत्येक जीवाची अशी एक खास गाथा या डीएनएवर आलेखलेली असते. शेवटी जीव म्हणजे काय तर अनेक प्रथिने, मेद आणि कर्बोदकांची एक पेशी. प्रत्येक पेशीतील महत्त्वाची कामे केली जातात मूलतः ती वेगवेगळ्या प्रथिनांद्वारे. चयापचयासाठी लागतात ती विकरे, सजीवाची वाढ अवलंबून असते ती हॉर्मोन्स ही सर्व प्रथिनेच असतात.

सर्व जीवसृष्टीत प्रथिने बनविणारा डीएनए सारखाच असतो. सर्व जीवसृष्टीचा आलेख जरी या ४ मुळाक्षरांनी लिहिलेला तरी असला त्या मुळाक्षरांच्या क्रमवारीवर जैवविविधता अवलंबून असते.

आपण फक्त मानवसृष्टीचा विचार केला तरी लक्षात येते की, एक माणूस दुसऱ्यासारखा नसतो. अगदी जुळ्या भावंडांतही काही तरी फरक असू शकतो. हा फरक घडतो तो डीएनएवरील मुळाक्षरांच्या क्रमवारीत असणाऱ्या फरकामुळे आपण लेखनात जशी विरामचिन्हे वापरून वाक्याला अर्थ देऊ शकतो त्याप्रमाणे डीएनएच्या या क्रमवारीत काही विरामचिन्हेही असतात. ही विरामचिन्हे म्हणजे दुसरे तिसरे काही नाही तर असा एखादा कोडॉन की जो कुठलेही अमिनो आम्ल दर्शवीत नाही. यांना ‘नॉन्सेन्स कोडॉन’ म्हणतात. असे कोडॉन्स विरामचिन्हांप्रमाणे काम करतात. आपल्या डीएनएमध्ये बराचसा भाग नॉनकोडिंग म्हणजे अर्थहीन असतो. ज्याला आपण ‘जंक डीएनए’ म्हणतो. ९९% मानवी डीएनए हा सर्वांच्यात सारखाच असतो फरक घडतो तो उरलेल्या १% डीएनएमुळे, जो प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळा असतो.

जसे आपल्या हाताचे उसे खास व्यक्तिगत असतात अथवा प्रत्येकाची डोळ्यांची “वेगळी बुबुळे असल्यामुळे उपयोग त्याचा आपल्या ओळखपत्रात करता येतो. त्याचप्रमाणे या जंक डीएनएचा उपयोग करून ‘डीएनए फिंगरप्रिंटिंग’ हे नवीन तंत्रज्ञान विकसित केले गेले आहे. हे तंत्रज्ञान गुन्हेगाराचा तपास करण्यासाठी अथवा स्वामित्व अधिकारासाठी वापरता येते.

-डॉ. मृणाल पेडणेकर, (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद, 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..