मुंबई बंदरात व्हिक्टोरिया गोदीत उभ्या असलेल्या ‘एस.एस. फोर्ट स्टिकीन’ या बोटीला १४ एप्रिल १९४४ रोजी लागलेली आग विझविताना मुंबई अग्निशमन दलातील ६६ अधिकारी आणि जवानांनी प्राणाची आहुती दिली होती. म्हणून १४ एप्रिल हा दिवस ‘अग्निशमन दिवस’ म्हणून पाळण्यात येतो. तसेच दरवर्षी १४ एप्रिल ते २० एप्रिल ‘अग्निशमन सेवा सप्ताह’ म्हणून साजरा करण्यात येतो. या सप्ताहात स्थानिक स्वराज्य संस्थांचे अग्निशमन दल, विविध कंपन्या/कार्यालये, सामाजिक संस्था त्या अनुषंगाने आग विझविण्याची विविध प्रात्यक्षिके, फायर ड्रिल, मॉक ड्रिल, व्याख्याने, परिसंवाद, प्रदर्शन व चित्रपटांच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्यक्रम दरवर्षी राबविण्यात येतात.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply