नवीन लेखन...

मराठीतले प्रथम भावगीत गायक जी.एन.जोशी

मराठीतले प्रथम भावगीत गायक जी.एन.जोशी यांनी गायलेले रानारानात गेली बाई शीळ हे त्यांचे भावगीत हे मराठीतले पहिले भावगीत समजले जाते.

जी.एन.जोशी यांचा जन्म ६ एप्रिल १९०९ रोजी झाला. ते उच्चशिक्षित वकील होते.

एचएमव्हीत रमाकांत रुपजी या वरिष्ठ अधिकार्‍याने जोशी यांना प्रथम आणले व नंतर तर त्यांना मराठी व शास्त्रीय संगीताच्या विभागाचे अधिकारीच करून टाकले.

जी.एन. जोशी, रमाकांत रुपजी व वसंतराव कामेरकर या अधिकार्‍यांच्या त्रयीने या भावगीतांच्या काळाला खरा आकार आणि आधार दिला. किती नव्या नव्या कलाकारांना त्यांनी हेरून प्रोत्साहन दिले व त्यांच्याकडून नेमकी रसिकांना आवडतील अशी गाणी करून घेतली त्याला तोडच नाही. शिवाय मराठी व हिंदी चित्रपटांच्या संगीताचे काम पुन्हा निराळे. अर्थात त्यात जोशी यांचा मुख्य वाटा नसला तरी स्टुडिओ उपलब्ध करून देणे, गायक व वादकांची रिहर्सलचे वेळापत्रक याचे ताळतंत्र पुन्हा त्यांनाच बघावे लागे. त्यात कलाकारांचा मूड सांभाळणे, त्यांना न दुखावणे ही मोठी जबाबदारी असायची. एच.एम.व्ही. त जी.एन. जोशी यांनी हे ४० वर्षे काम लीलया सांभाळले.

त्या काळात कलाकारांना लोकांसमोर येण्यासाठी एचएमव्ही हे एकच मोठे व्यासपीठ होते. त्यामुळे जी.एन. जोशी हे एचएमव्हीतले दादा अधिकारी समजले जात. एचएमव्ही मध्ये अधिकारी असताना शास्त्रीय संगीताच्या कलाकारांकडून जोशी यांनी अनेक रेकॉर्ड्‌स करून घेतल्या.

‘रानारानांत गेली बाई शीळ गं, राया तुला रे काळवेळ नाही, ताळमेळ नाही’ असे म्हणणार्‍या एका प्रेमात पडलेल्या तरुणीचे हे मनोगत मेहेकरचे कवी ना.घ. देशपांडे यांनी लिहिले होते. जोशी यांनी ते निवडले व चाल लावून म्हणायला सुरुवात केली. एका कार्यक्रमात रमाकांत रूपजी यांनी ते ऐकले व त्याची ध्वनिमुद्रिका करण्याचे ठरले. या शीळेच्या गाण्यामुळेच जोशी यांचा एचएमव्हीत (हिज मास्टर्स व्हॉईस ग्रामोफोन कंपनीत) प्रवेश झाला व पुढे या शीळेनेच त्यांना वकिलीचे ज्ञान विसरण्यास भाग पाडले.

१९३५ साली मराठीतल्या या पहिल्या भावगीताची ध्वनिमुद्रिका निघाली आणि महाराष्ट्राच्या घरांघरांत पोहोचली. तुफान खप असलेल्या या तबकडीमुळे एचएमव्हीचा मोठा आर्थिक फायदा झाला आणि जी.एन. जोशी यांचा एचएमव्हीत प्रवेश झाला.

जी.एन. जोशी यांचे निधन २२ सप्टेंबर १९९४ रोजी झाले.

— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.विकिपीडिया

मा.जी.एन.जोशी यांनी गायलेली भावगीते

अशी घाल गळा मिठी बाळा

आकाशीच्या अंतराळी (कवी – अनिल)

आमराईत कोयल बोले (कवी – स.अ. शुक्ल)

आमुचे नाव आंसू ग

आलात ते कशाला, प्रिय जाहला कशाला

उघड दार उघड दार

एकटीच भटकत नदीकाठी

एकत्र गुंफून जीवित-धागे

कन्हैय्या दिसशी किती साधा (कवी – स.अ. शुक्ल)

काळ्या गढीच्या जुन्या

चकाके कोर चंद्राची (सहगायिका गांधारी ऊर्फ गंगूबाई हनगळ). कवी – स.अ. शुक्ल

चल रानात साजणा (कवी – स.अ. शुक्ल)

जादुगारिणी सखे साजणी (कवी – स.अ. शुक्ल)

झुळझुळ वाहे चंद्रभागा (कवी – स.अ. शुक्ल)

डाव मांडून भांडून मोडू नको, डाव मोडू नको (कवी ना.घ. देशपांडे).हे गाणे पुढे सुधीर फडके यांच्याही आवाजात ध्वनिमुद्रित झाले.

डोळे हे जुल्मी गडे, रोखून मज पाहू नका (कवी भा.रा. तांबे. हे गाणे पुढे लता मंगेशकर यांनीही गायले. तेव्हा त्याचे संगीत वसंत प्रभू यांचे होते.

तू तिथे अन मी इथे हा (सहगायिका गांधारी ऊर्फ गंगूबाई हनगळ). कवी – स.अ. शुक्ल

देव माझा तू कन्हैय्या (कवी – स.अ. शुक्ल)

नज सोडवे पदाला

नदीकिनारी, नदीकिनारी गं (कवी ना.घ. देशपांडे)

प्रिय जाहला कशाला (कवि.- वि.द. घाटे)

प्रेम कोणीही करेना, का अशी फिर्याद खोटी

फार नको वाकू जरी

बहु असोत सुंदर

मंजूळ वच बोल सजणा (सहगायिका लीला लिमये). कवी – स.अ. शुक्ल

 पूजा
poojapradhan323@gmail.com
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..