भारताचे पहिले कसोटी कर्णधार सी. के. नायडू यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १८९५ रोजी झाला.
सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि कल्पक कर्णधार अशी असलेल्या कर्नल कोट्टारी कनकैया तथा सी.के. नायडू यांना सात कसोटीत ३५० धावाच करता आल्या तरी तब्बल सहा दशके त्यांनी डोमेस्टिक क्रिकेट गाजवले.
६८व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळणा-या नायडू यांनी २०७ डोमेस्टिक सामन्यात ११,८२५ धावा फटकवल्या.
भारत सरकारने १९५६ मध्ये सी. के. नायडू यांना पद्म भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.
सी. के. नायडू यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बीसीसीआयतर्फे सी. के. नायडू स्पर्धा आयोजित केली जाते.
सी. के. नायडू यांचे १४ नोव्हेंबर १९६७ साली निधन झाले.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply