पाऊस पहिला बरसतो,
वसुंधरेस ओलेचिंब करतो,
गर्भातून तिच्या अंकूर फुटतो,
आणि हिरवाईचा बहर पसरतो;
पहिला पाऊस बरसतो,
भूतकाळ उभा ठअकतो,
आठवणींचा वेध घेताना,
कधीतरी पापण्या ही ओलावून जातो;
स्मृतींची दरवळता,
गंधातून त्याचा,
मनास देती आनंद
तर कधी अवखळता;
अंतरंगात असते जरी त्याच्या आगमनाची आतुरता
बरसल्या नंतर मनी का होई गडद छायेची काहुरता?
असा कसा हा विरोधा भासाचा खेळ?
जो तुझ्या येण्यानेही वाढवेल घालमेल.
असे कसे तुझे रुप,
जिथे सजीव होती,
कधी अत्यानंदी, तर
कुठे अतीव दु:खी,
तरीही अप्रुप निर्माण करणारा,
निसर्गाला मोहिनी घालणारा,
नवचैतन्याचे बीज पेरणारा,
ओलाव्याच्या स्पर्शाने,
हवाहवासा वाटणारा
पाऊस पहिला……. पाऊस पहिला.
— सागर मालाडकर
Leave a Reply