प्रथम आम्ही भारतीय आहोत..! पहले हम भारतीय है..! First We R Bhartiy…!
भारतात राहणाऱ्या तमाम भारतीयांना, आपल्या भारतमातेच्या विविधतापूर्ण गुणवैशिष्ट्यांवर अगाढ प्रेम आहे. या देशात सांस्कृतिक, ऐतिहासिक, धार्मिक, भाषिक, शैक्षणिक अशा अनेकबाबतीत विविधता असली तरी, सर्वांचे एकमत आहे की, ‘आम्ही सर्व भारतीय आहोत.’
भारतमातेचे सुख आणि दुःख आम्ही आपले मानतो. भारतमातेची उन्नती आणि अवनती ही आमची उन्नती –अवनती आहे, हे आम्हा सर्वांना ज्ञात आहे.आम्हाला कितीही जन्म मिळाले तरी, मातृभूमिचे ऋण मात्र आम्ही फेडू शकत नाही. परंतु त्या ऋणांची जाणीव ठेवून, मातृभूमीसाठी काही करता आले तर, ʻʻस्वातंत्र्ययज्ञात प्राणाहुती देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना श्रद्धांजली ठरेल .ʼʼ
भारतमातेच्या प्रेमापोटी प्रत्येकाच्या हृदयात लक्ष-लक्ष भावनांचे हिमालय उचंबळून येतात. आपल्या भावनांचे प्रकटीकरण करण्यासाठी हक्काचे स्थान असले की, राहवत नाही. हृदयातील प्रेमभरतीला शब्दांचे स्वरूप प्राप्त होते. हेच शब्द आपल्या विचारांचे प्रकटीकरण ठरावे. हे प्रकटीकरण कोणावर आरोप-प्रत्यारोप करणारे, अश्लील, असभ्य नसावे. तसेच भारताची एकता, एकात्मता, अखंडता, सुरक्षितता, संप्रभूता, विविधता, सार्वभौमिकता यांना बाधा पोहचविणारे नसावे ही मनापासून अपेक्षा आहे.
— नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
Leave a Reply