बासरीवादक अमर ओक यांचा जन्म १३ जून १९७५ रोजी झाला.
बासरीवादन म्हणजे शास्त्रीय संगीतच असणार, त्यात काय मजा येणार, हा सामान्य प्रेक्षकांचा समज खोडून काढणारे बासरीवादक अमर ओक. अमर ओक हे प्रसिद्ध बासरीवादक असून त्यांनी बासरीवादनाचे अनेक कार्यक्रम यशस्वी केले आहेत. विविध चॅनेल्सवरील कार्यक्रमात ते सहभागी होत असतात. त्या माध्यमातून त्यांच्या बासरीची धुन संगीतप्रेमींना परिचयाची झाली आहे.
अमर ओक यांचे शिक्षण कॉम्पुटर सायन्स मध्ये पण करीयर केले बासरीवादनात. अमर ओक ह्यांनी आपल्या बासरी वादनाचे प्राथमिक धडे, साने व भावे गुरुजीच्याकडे घेतले. पुढे त्यांनी सच्चिदानंद फडके यांच्या कडे शिक्षण घेतले.
अमर ओक यांचा अमर बन्सी हा कार्यक्रम खूप गाजला आहे. अमर ओक आपल्या अमर बन्सी या कार्यक्रमा बद्दल बोलताना म्हणतात टीव्ही वर आयडिया सारेगमप सुरू झाले आणि गायक मंडळींसोबतच अनेक वादक मंडळीही घराघरात पोहोचली. या गाण्यांच्या मध्ये आम्ही एकादा संगीताचा तुकडा सादर करायचो. तेव्हा लोकांना ते आवडायचे. मात्र, या कार्यक्रमात लहानसा तुकडा सादर झाल्याने त्यांना हा सांगीतिक अनुभव अजून अधिक प्रमाणात हवा, असे वाटायचे. यातून ‘अमर बन्सी’ कार्यक्रमाची निर्मिती झाली. केवळ वाद्यांच्या माध्यमातून आम्ही रसिकांना संगीत अनुभव द्यायला लागलो. त्याचा २००८ मध्ये पहिला कार्यक्रम.
अमर ओक यांच्याकडे एकूण ३० बासऱ्या आहेत, या बासऱ्या ६ इंचांपासून ३८ इंचांपर्यंतच्या आहेत. अमर ओक यांनी अवधूत गुप्ते, अजय अतुल, सलील कुलकर्णी, स्वप्नील बांदोरकर, वैशाली सामंत अश्या अनेक संगीतकारांच्या बरोबर काम केले आहे.
अमर ओक यांचे चिरंजीव अभय हा लहान असून सुद्धा उत्तम बासरी वादन करतो.
Leave a Reply