नवीन लेखन...

झाले गेले विसरुन जावे, पुढे पुढे चालावे..!

कोणीतरी कोणतीतरी गोष्ट केल्यामुळे किंवा न केल्यामुळे किंवा बोलल्यामुळे आपण दुखावले गेलेलो असतो.काही गोष्टींसाठी घरचांवर,नाते संबंधांवर,व्ययवसायावर आपण रागवलेले असतो.भूतकाळात आपल्या हातून काही चूका झालेल्या असतात ज्यांचा आपल्याला खूप पश्चाताप होत असतो.काही गोष्टी मनासारख्या झालेल्या नसल्यामुळे आपण निराश झालेले असतो.पण या सगळ्या गोष्टींचा सतत विचार करून त्यातून काही निष्पन्न होणार आहे का ?

घडून गेलेल्या,बदलता न येणाऱ्या गोष्टींचा सतत विचार केलात तर तुमची सगळी भावनिक ऊर्जा त्यात वाया जाते, त्यामुळे तुम्ही नकारात्मक विचार करु लागता आणि मग त्यातून काहीच निष्पन्न होत नाही.मग अशावेळी तुम्ही  त्या गोष्टी विसरायला हव्या, त्या विचारांमधून स्वतःला मुक्त करायला हवे आणि पुढे जायला हवे.

स्वतःला त्या विचारांपासून वेगळे करणे कठीण आहे पण अशक्य नाही –

  • ती प्रत्येक व्यक्ती जीने तुम्हाला कोणत्याही प्रकारचे दुःख दिलेले आहे तिला माफ करा.माफ करणे कदाचित थोडे जड जाईल,कठीण जाईल. पण काळजी करु नका.जेव्हा तुम्ही तस कराल तेव्हा लवकरच तुम्हाला हलक हलक आणि आनंदी वाटायला सुरुवात होईल.तुमचा राग, द्वेष जसजसा कमी होईल तसतसे तुमचे मन चांगल्या सकारात्मक विचारांनी भरून जाईल.
  • माफ केलच पाहिजे अशी सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वत:, तुम्ही आतापर्यंत केलेल्या ,बोललेल्या, वागलेल्या सर्व चुकीच्या गोष्टींबद्दल स्वतःला पूर्णपणे माफ करायला पाहिजे.चुकीच्या केलेल्या बऱ्याच गोष्टी मनातून काढून स्वतःला माफ करायला कठीण जाईल.पण तुम्ही असा विचार करायला हवा की,ज्या काही गोष्टी घडल्या तेव्हाचे तुम्ही आणि आताचे तुम्ही यात बराच फरक आहे.तेव्हा तुम्हाला तेवढी समज नव्हती, अनुभव नव्हता म्हणून तस तुमच्याकडून घडले.अशाप्रकारे स्वतःला त्यातून मुक्त करा.त्या सगळ्या घडून गेलेल्या गोष्टी होत्या आणि आता तुम्ही वर्तमानात आहात. हो पण, त्या चुका परत तुमच्याकडून होणार नाही याची काळजी घ्या, चुकांमधून धडा घ्या.
  • जर तुमच्यामुळे कोणाला त्रास झाला आहे आणि त्यामुळे तुम्हाला त्रास होतो आहे,तर तुम्ही त्या व्यक्तीला भेटा, त्या व्यक्तीशी बोला.बोलून प्रश्न सुटू शकतात.जर समोर जाता येत नसेल तर लिहून क्षमा मागा.लिहण्यासाठी आता बरेच मार्ग खुले आहेत आपल्याकडे.त्या व्यक्तीची प्रतिक्रिया काहीही असो, माफी मागितल्यामुळे तुमचे मन शांत होईल आणि तुम्हाला मोकळे वाटेल.
  • कोणी आपल्याला काही वाईट बोलले की आपल्या मनाला ती गोष्ट खूप लागते.पण कोणी काहीही बोलेल मनाला लावायची काहीच गरज नहिये.विसरुन जा ते काय बोलले ते.लोक आपल्याबद्दल चांगले  बोलतील, चांगले वागतील अशी अपेक्षाच कधी ठेऊ नका.स्वतःला फक्त कामात झोकून दया आणि पुढे चला, मग बघा तीच लोक तुमचे कौतुक करायला कसे पुढे येतात.

तुमच्या सोबत घडलेल्या गोष्टींना सकारात्मक दृष्टिकोनातून बघा.त्या सगळ्या अनुभवांनी कसे तुम्हाला एक हुशार,चांगला माणूस बनवले आहे यावर भर दया.ज्या ज्या लोकांनी तुम्हाला दुखावले त्यांचे आभार माना, त्यांच्यामुळेच तर आपण एवढे कणखर बनलो.अन्यथा अस होऊ शकल नसत.

आयुष्यात अनपेक्षित आणि नको असलेल्या घटना पुढे भविष्यात पण घडत राहतील पण त्यांचा हेतू फक्त तुम्हाला कणखर, निर्भीड आणि एक उत्तम माणूस बनवण्यासाठी असेल.
आपल्या ऊर्जेचा आणि वेळेचा जास्तीत जास्त वापर आपण आपल्यात बदल घडवण्यात म्हणजे स्वतःला आधी पेक्षा चांगले बनवण्यात करायला हवा म्हणून झालेले गेलेले सगळे विसरुन जा आणि आयुष्याच्या वाटेवर पुढे सकारात्मक वाटचाल करा.
— अपूर्वा रविंद्र जोशी 

Avatar
About अपूर्वा जोशी 6 Articles
मी अपूर्वा जोशी. मला मराठी भाषेचा अभिमान आहे. मराठी साहित्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायला हवे हे माझे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..