नवीन लेखन...

दूरदर्शनचे माजी अतिरिक्त संचालक कमलेश्वर

कादंबरीकार, लेखक, समीक्षक, चित्रपट पटकथालेखक, दूरदर्शनचे माजी अतिरिक्त संचालक कमलेश्वर यांचा जन्म ६ जानेवारी १९३२ रोजी मेनपुरी, उत्तर प्रदेश येथे झाला.

हिंदी साहित्याला नवे आयम व भारतीय साहित्याला आंतरराष्ट्रीय परिमाण देणारे साहित्यिक म्हणजे सुप्रसिद्ध लेखक कमलेश्वर.

कमलेश्वर यांचे पूर्ण नाव कमलेश्वर प्रसाद सक्सेना. कमलेश्वर यांचा हिंदी साहित्यात एक दबदबा होता. कमलेश्वर यांनी ९९ चित्रपटासाठी संवाद, कहाणी किंवा पटकथा लेखन केले, यात सौतन की बेटी, लैला, यह देश, रंग बिरंगी, सौतन, साजन की सहेली, राम बलराम, मौसम, आंधी यांचा समावेश आहे. कमलेश्वर यांनी अनेक हिंदी चित्रपटांच्या कथाही लिहिल्या आहेत. सारा आकाश, अमानुष, आंधी, सौतान की बेटी, लैला आणि मौसम यासारख्या चित्रपटाच्या पट कथांव्यतिरिक्त ‘मि.नटवरलाल ‘,’ द बर्निंग ट्रेन ‘,’ राम बलराम ‘या चित्रपटांसह अनेक हिंदी चित्रपटाचे लेखन केले. कमलेश्वर यांच्या काली आंधी’ आणि ‘आगामी अतीत’ या कादंबऱ्यांवर आणि त्यांच्याच पटकथांवर गुलझार यांनी अनुकमे ‘आँधी’ आणि ‘मौसम’ हे दोन चित्रपट दिग्दर्शित केले होते.

‘चंद्रकांता’, ‘युग’, ‘बेताल पचीसी’, ‘आकाश गंगा’, ‘नाम पर लिट नाम’ इत्यादी दूरदर्शन मालिकेसाठी लिहिले. कमलेश्वर यांनी राजा निरबंसिया, मांस का दरिया, नीली झील, तलाश, बयान, नागमणि, अपना एकांत, आसक्ति, ज़िंदा मुर्दे, जॉर्ज पंचम की नाक, मुर्दों की दुनिया, कस्बे का आदमी, स्मारक अशा ३०० हून अधिक कथा लिहिल्या.

कमलेश्वर यांनी अधूरी आवाज़, रेत पर लिखे नाम, हिंदोस्ता हमारा ही नाटकेही लिहीली आहेत. ७० च्या दशकात कमलेश्वर यांच्या राजा निसबंसिया ही कथा खूप गाजली. त्यांची कितने पाकिस्तान हे ही कादंबरी प्रचंड गाजली. ‘कितने पाकिस्तान’ ही २00३ मध्ये साहित्य अकादमीने गौरविलेली साहित्यकृती आहे.

ते काही काळ टाईम्स वृत समुहाच्या सारिका या पाक्षिकाचे संपादक होते. ते दूरदर्शनचे महासंचालकही राहिले होते. दूरदर्शनच्या सरकारी काळया-पांढऱ्या पड्द्यावर १९७० च्या दशकात चैतन्य फुकले ते कमलेश्वर आणि तबस्सुम या द्वयीने.. कमलेश्वर यांनी दूरदर्शनला सामाजिक-वैचारिक परिमाण दिले, तर तबस्सुम यांनी पसत मनोरंजनाचे परिमाण. दर आठवड्याला एखाद्या समकालीन सामाजिक- सांस्कृतिक मुहावरे बारीक चर्चा घडवून आणण्याच्या ‘परिक्रमा’ या कमलेश्वर यांच्या कार्यक्रमाची वेळ चुक नये म्हणून संध्याकाळी नोकरदार मंडळी धडपड धावपळ करीत घर गाडीत, या गोष्टीवर, आजच्या मालिकांत रमणाच्या आजच्या तरुण पेक्षकांचा विश्वास बसणार नाही. परंतु ‘परिक्रमा ची ओढ तसूभरही कमी नव्हती. याला कारण होती ते सादरकर्ते कमलेश्वर यांची त्या त्या विषयाशी असलेली उत्कट आणि कृतिशील बांधीलकी आणि त्यांचे शैलीदार, पण सहज हिंदीतील सादरीकरण.

त्यांना २००५ मध्ये पद्मभूषण देऊन भारत सरकारने गौरवले. कमलेश्वर यांचा एक धडा लहानपणी हिंदीच्या पाठ्यपुस्तकात होता. त्यात म्हटलं होतं :- ‘‘इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, ‘जो गरज असताना मदत करतो तो खरा मित्र’. मात्र, हे चुकीचं आहे. गरजेच्या वेळी आपण अनोळखी व्यक्तीलाही मदत करतो. त्यामागं आपल्यात असलेली माणुसकी हे कारण असतं. मैत्री हे कारण नसतं. मग मैत्री म्हणजे काय?’’ कमलेश्वर म्हणतात, ‘जो मित्र की उत्कर्षता बरदाश्तै कर सकता है वो ही सच्चा मित्र होता है’ ज्याला आपल्या मित्राच्या उन्नतीतून खरा आनंद मिळतो, तोच खरा मित्र असतो.

कमलेश्वर यांचे २७ जानेवारी २००७ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलेश्वर यांना आदरांजली.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..