नवीन लेखन...

माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन

शैलीदार फलंदाज, माजी कर्णधार आणि वादग्रस्त क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९६३ रोजी  हैदराबाद येथे झाला.

शैलीदार फलंदाज, माजी कर्णधार आणि वादग्रस्त क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांनी पदार्पणाच्या तीन कसोटींमध्ये तीन शतके झळकवत जागतिक विक्रमासह क्रिकेटमध्ये थाटात आगमन केले होते. मोहम्मद अझरुद्दीन हा आवडता खेळाडू होता तो मनगटी फटके आणि चपळ क्षेत्ररक्षण या गुणांमुळे. ते मधल्या फळीतील फलंदाज होते. ३१ डिसेंबर १९८४ रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन येथे इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये अजहरुद्दीनने पदार्पण केले आणि पहिल्या तीन सामन्यांमध्ये तीन शतके झळकावली. अझरुद्दीन यांनी ९९ कसोटी सामने खेळत एकूण २२ शतके झळकवली, श्रीलंकेविरुद्ध १९९ सर्वाधिक धावा केल्या आहेत.त्याने पदार्पणात लागोपाठच्या सलग कसोटी सामन्यांत शतके झळकावण्याचा विक्रम केला आहे. ४५ च्या सरासरीने आणि एकदिवसीय सामन्यात ३७ च्या सरासरीने ७ शतके केली. क्षेत्ररक्षक म्हणून त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५६ झेल घेतले. ३०० एकदिवसीय सामने खेळणारा तो पहिला खेळाडू ठरला.

१९८०च्या मध्यावर निवृत्त होत गेलेल्या काही मातब्बर फलंदाजांची उणीव अझरने भासू दिली नाही. मोहम्मद अझरुद्दीन यांनी ४७ कसोटीत भारताचे कर्णधारपद भूषवले होते. कर्णधार म्हणून मोहम्मद अझरुद्दीन बऱ्यापैकी यशस्वी ठरला, तरी ते यश अझरच्या नेतृत्वगुणांचे नक्कीच नव्हते. २००० मध्ये मॅच फिक्सिंग प्रकरणात त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीवर बीसीसीआयने जीवनभर बंदी घातली. कारकीर्दीच्या अखेरच्या दिवसांमध्ये मॅच-फिक्सिंगमध्ये तो गुंतल्याचे आढळल्यानंतर अझरची प्रतिष्ठा धुळीला मिळाली. ८ नोव्हेंबर २०१२ रोजी आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने ही बंदी उठवली होती. २००९ मध्ये, काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर मोरादाबाद मतदारसंघातून मोहम्मद अझरुद्दीन संसदेत सदस्य म्हणून निवडून आले होते.

१९८६ मध्ये अझरुद्दीन यांना अर्जुन पुरस्कार आणि १९८८ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९९१ साली त्यांना विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारही मिळाला. १९८७ मध्ये अझरुद्दीन यांनी नऊरीन यांच्याशी विवाह केला होता. १९९६ साली त्यांनी नऊरीन बरोबर घटस्फोट घेतला आणि अभिनेत्री संगीता बिजलानीशी लग्न केले. अझरचे संगीता बिजलानी बरोबरही २०१० साली घटस्फोट झाला.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..