नवीन लेखन...

भारताचे भूतपूर्व सरसेनापती जनरल के एस थिमय्या

सरसेनापती जनरल के एस थिमय्या यांचा जन्म ३१ मार्च १९०६ रोजी कूर्ग (कर्नाटक) येथे झाला.

कोदेंदर सुबय्या थिमय्या हे त्यांचे पूर्ण नाव होय. थिमय्या यांचे शालेय शिक्षण बंगलोर येथे व डेहराडून येथील राष्ट्रीय सैनिकी विद्यालयात प्राथमिक लष्करी शिक्षण झाले. त्यानंतर इंग्लंडमधील शाही सैनिकी महाविद्यालयात शिक्षण घेतल्यावर १९२६ साली हैदराबाद पायदळ रेजिमेंट (सध्याची कुमाउँनी) मध्ये राजादिष्ट अधिकारी म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

त्यांनी १९३५ मध्ये नीना करिअप्पा यांच्याशी विवाह केला. १९३६–३९ मध्ये मलायात कामगिरी. १९४१ साली स्टाफ कॉलेजचा शिक्षणक्रम पूर्ण. दुसऱ्या महायुद्धात आराकान मोहिमेत ३६व्या पायदळ ब्रिगेडचे प्रथम ब्रिगेडिअर. त्यांच्याच हाताखाली ले. कर्नल (आता ले. जनरल) शं. पां. पाटील थोरात व लि. प्र. ऊर्फ बोगी सेन हे दोघे पायदळ अधिकारी होते. सप्टेंबर १९४५ मध्ये जपानकडून लष्करी शरणागती स्वीकारण्याच्या वेळी हिंदुस्थानी सेनेचे हे एकमेव प्रतिनिधी होते. १९४६ साली जपानमध्ये २६८ या ब्रिगेडचे मुख्याधिपती.

१९४७ च्या फाळणीनंतर त्यांनी निर्वासितांच्या पुनर्वसन कार्यात मोठी कामगिरी बजावली. १९४८ मध्ये काश्मीरमधील आक्रमकांचा पराभव करणाऱ्या भारतीय सेनेचे प्रमुख. १९५०–५१ साली राष्ट्रीय सैनिकी प्रबोधिनीचे समादेशक (कमांडंट). १९५१–५२ मध्ये संयुक्त राष्ट्रांतील भारतीय प्रतिनिधी मंडळाचे सैनिकी सल्लागार. कोरियन युद्धानंतर (१९५०–५३) युद्धकैदी स्वदेश प्रत्यावर्तन कार्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या आयोगाचे अध्यक्ष व पंच. जनरल के.एस थिमय्या यांनी भारताचे लष्करप्रमुख म्हणून ८ मे १९५७ ते ७ मे १९६१ काम केले. याच कालखंडात त्यावेळचे संरक्षणमंत्री कृष्ण मेनन यांच्याशी झालेल्या मतभेदावरून त्यांनी आपल्या जागेचा राजीनामा देण्याचा व तो परत घेण्याचा प्रसंग घडला.

१९६१ साली ३५ वर्षांच्या सेवेनंतर ते सेवानिवृत्त झाले. जून १९६४ पासून त्यांच्या निधनापर्यंत सायप्रससध्ये ग्रीक व तुर्क यांच्यात शांतता राखण्यासाठी, संयुक्त राष्ट्रसंघ शांतिसेनेचे सेनापती म्हणून काम केले. त्यांच्या सैनिकी व इतर महत्त्वाच्या कार्यामुळे त्यांचा माननीय असा उल्लेख (१९४४) करण्यात आला व त्यांना महावीर चक्र आणि पद्मभूषण या पदव्या देऊन गौरविण्यात आले आहे.

सायप्रसमध्ये कार्यरत असतानाच जनरल थिमय्या यांचे १८ डिसेंबर १९६५ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

संदर्भ:- इंटरनेट/ दीक्षित हे. वि./मराठी विश्वकोश

पुणे.

Avatar
About सतिश चाफेकर 448 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..