मुंबई क्रिकेट असोसिएशनचे निवड समितीचे प्रमुख, भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू आणि अभिनेते सलिल अंकोला यांचा जन्म दि. १ मार्च १९६८ रोजी झाला.
सलील अंकोला यांनी एक क्रिकेटर म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. क्रिकेटच्या इनिगनंतर ते अभिनयाकडे वळले.आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये सलील अंकोला यांनी सचिन तेंडुलकरसोबत पदार्पण केलं होतं. दुर्दैव असं की अंकोला यांच्यासाठी हा सामना कसोटी कारकिर्दीतील पहिला आणि अखेरचा सामना ठरला. त्यानंतर अंकोला यांना कसोटीत खेळण्याची संधी मिळाली नाही. अंकोला यांनी आपल्या कारकिर्दीतील अखेरचा सामना १३ फेब्रुवारी १९९७ रोजी खेळला होता. सलील यांनी १९८९-१९९७ दरम्यान आपल्या क्रिकेट कारकिर्दीत एक कसोटी आणि २१ एकदिवसीय सामने खेळले.’बोन ट्यूमर’चं संकट सलील अंकोला यांना हाडाचा कॅन्सर (बोन ट्यूमर) झाल्यानं त्यांना हळूहळू क्रिकेटपासून दूर व्हावं लागलं. वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी अंकोला यांना क्रिकेटला रामराम करावं लागलं. त्यानंतर अंकोला यांनी अभिनयाच्या क्षेत्रात आपलं नशीब आजमवलं व ते यशस्वी देखील झाले.
‘विकराल गबराल’,’शूssss कोई है’,’कोरा कागज’,’कर्म अपना अपना’ या गाजलेल्या मालिकांमध्ये अंकोला यांनी काम केलं आहे. सलील हे टीव्ही शो आणि चित्रपटांव्यतिरिक्त खतरों के खिलाडी सीझन 1, पॉवर कपल, बिग बॉस सीझन 1, इत्यादींसह अनेक टीव्ही रिअॅलिटी शोचा भाग राहिले आहेत. पॉवर कपल या कार्यक्रमात सलील त्याची पत्नी रियासोबत झळकला होता. २०२० मध्ये त्यांनी पुन्हा एकदा क्रिकेट क्षेत्रात पाऊल ठेवलं. अंकोला सध्या मुंबई क्रिकेट असोसिएशनचे निवड समितीचे प्रमुख आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply