भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू जोगिंदर शर्मा यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९८३ रोजी झाला.
भारताच्या पहिल्या-वहिल्या टी-२० विजयात जोगिंदर शर्माने मोलाचा वाटा उचलला होता. जोगिंदर शर्माला २००७ च्या टी२० विश्वचषकाचा हिरो समजले जाते. अंतिम सामन्यात पाकिस्तानला विजयासाठी १३ धावांची आवश्यकता होती. परंतु त्यावेळी पाकिस्तानला केवळ ८च धावा करता आल्या. जोगिंदरच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे भारतीय संघ पहिल्यांदाच टी२० विश्वचषक अंतिम सामन्यात शेवटचे षटक टाकताना पाकिस्तानच्या मिसबा-उल-हकला बाद करत जोगिंदरने भारताच्या ऐतिहासिक टी-२० विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
मात्र दोन वर्षात चार वनडे आणि चार टी-२० सामनेच तो खेळू शकला आहे.
जोगिंदर शर्मा सध्या हरियाणामध्ये पोलिस अधिकारी (डीएसपी) पदावर कार्यरत आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply