नरेन ताम्हाने याचा जन्म ४ ऑगस्ट १९३१ रोजी मुंबई येथे झाला.
नरेन ताम्हाने हे यष्टीरक्षक-फलंदाज होते. १९५३ ५४ ते १९६३ ६४ या काळात ते मुंबईकडून रणजी ट्रॉफीमध्ये खेळले.
नरेन ताम्हाणे यांनी २१ कसोटी खेळून २७ डावात १०.२ च्या सरासरीने २२५ धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्याचे अर्धशतक आहे. नरेन ताम्हाणे यांनी आपल्या कसोटी क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात १ जानेवारी १९५५ रोजी पाकिस्तानविरुद्ध केली होती. नरेन ताम्हाणे हे आपला शेवटचा कसोटी सामना ३० डिसेंबर १९६० रोजी पाकिस्तान विरुद्ध खेळले होता.
नंतर त्यांनी निवड समितीवर काम केले ज्यात त्यांनी सचिन तेंडुलकरची निवड प्रथम श्रेणी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी केली होती.
नरेन ताम्हाने यांचे १९ मार्च २००२ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply