भारतीय क्रिकेट संघाचा विक्रमवीर लेगस्पीनर माजी कर्णधार अनिल कुंबळे ७ फेब्रुवारी १९९९ रोजी कुंबळेने क्रिकेट विश्वातील एका अनोख्या विक्रमाशी बरोबरी केली होती. कसोटी क्रिकेटमध्ये एखाद्या गोलंदाजाने एकाच डावात १० बळी घेणे ही दुर्मिळातील दुर्मिळ बाब. पण दिल्लीत पाकिस्तानविरुद्ध तशी करामत कुंबळेने करून दाखवली. पाकिस्तान विरूध्दच्या दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर खेळलेल्या त्या कसोटीत कुंबळेने डावातील सर्वच्या सर्व १० गडी बाद करण्याची कमाल केली होती. त्याने ७४ धावांत पाकिस्तानच्या १० विकेट्स घेतल्या. त्याने १८.२ षटकांच्या एकाच स्पेलमध्ये ३७ धावा देत पाकिस्तानचा धुव्वा उडवला. भारताचा २१२ धावांनी विजय झाला.
२३ कसोटी सामने आणि २० वर्षातील भारताचा पाकिस्तानविरुद्धचा तो पहिला विजय ठरला. इंग्लिश खेळाडू जिम लेकर नंतर तो दुसरा असा गोलंदाज ठरला होता ज्याने प्रतिस्पर्धी संघाच्या दहाच्या दहा फलंदाजानां टिपले. कुंबळेच्या आधी केवळ इंग्लंडचे ऑफस्पिनर जिम लेकर यांनीच एका डावात १० विकेट्स घेऊन दाखवल्या होत्या.
कुंबळेची जिद्द, त्याचा करारीपणा मैदानावर सातत्याने दिसून यायचा. त्याने आपल्या फिरकीने भल्या भल्या फलंदाजांना खेळपट्टीवर नाचवले आहे. पाकिस्तानी खेळाडू तर हे कधीही विसरणार नाहीत. इंग्लंडचे रिचर्ड स्टोक्स यांनी या दोन्ही करामती मैदानावर उपस्थित राहून पाहिल्या. असे भाग्य लाभलेले ते कदाचित पृथ्वीतलावरचे एकमेव गृहस्थ असावेत!
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply