न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल व्हेटोरीचा जन्म २७ जानेवारी १९७९ रोजी झाला.
न्यूझीलंडच्या फिरकी गोलंदाजीचा हुकमी एक्का, उपयुक्त फलंदाज आणि सभ्य माणूस अशी खेळाला साजेशी प्रतिमा डॅनियल व्हेटोरीची होती. न्यूझीलंडकडून सर्वाधिक सामने आणि सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे. प्रमुख फिरकी गोलंदाज, उपयुक्त फलंदाज, चपळ क्षेत्ररक्षक व न्यूझीलंडचा कर्णधार अशी डॅनियल व्हेटोरीने अशी मोलाची कामगिरी केली होती. डॅनियल व्हेटोरीने वयाच्या १८व्या वर्षी न्यूझीलंडकडून १९९७ साली पदार्पण केले. डॅनियल व्हेटोरी हा १८व्या वर्षी कसोटी पदार्पण करणारा तो न्यूझीलंडचा सर्वात लहान क्रिकेटपटू तसेच १०० कसोटी बळी घेणाराही तो सर्वात युवा गोलंदाज होता.
आपल्या कारकीर्दीत २९५ लढतीत ३७.७१च्या सरासरीने ३०५ विकेट घेतल्यात. २२५३ धावाही त्याने केल्यात. त्यात चार अर्धशतकांचा समावेश आहे. न्यूझीलंडतर्फे सर्वाधिक वनडे खेळलेला तो क्रिकेटपटू आहे. पाच विश्वचषकांत (१९९९-२०१५) असे पाच वर्ल्डकप खेळणा-या व्हेटोरीने ३२ लढतींमध्ये ३६ विकेट घेतल्यात. २०१५ मध्ये ११व्या विश्वचषक स्पर्धेत त्याने १५ विकेट घेत न्यूझीलंडला अंतिम फेरीत पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलला होता.
आपल्या १७ वर्षाच्या कसोटी कारकीर्दीत ११३ सामन्यांत ३६२ विकेट आणि ४५३१ धावा व्हेटोरीच्या नावावर आहेत. त्याच्या विकेट न्यूझीलंडतर्फे सर्वाधिक आहेत. तसेच कसोटीत तीनशेहून अधिक विकेट आणि चार हजारहून अधिक धावा करणाऱ्या भारताचा महान अष्टपैलू कपिलदेव आणि इंग्लंडचा इयन बोथम यांच्या पंक्तीत व्हेटोरीने स्थान मिळवलेय. त्यानं ६ शतके आणि २३ अर्धशतके ठोकलीत. ३४ आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये व्हेटोरीने ३८ विकेट घेतल्यात. कर्णधार म्हणूनही डॅनियल व्हेटोरी यशस्वी ठरलाय. त्याने ३२ कसोटी आणि ८२ वनडेमध्ये नेतृत्व केलेय.
डॅनियल व्हेटोरीने २०१५ मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
डॅनियल व्हेटोरी सध्या बांगलादेश क्रिकेट संघाच्या फिरकी गोलंदाज सल्लागार म्हणून काम करतो आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply