लालबहादूर शास्त्री यांचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ रोजी मोगलसराई या उत्तर प्रदेशातील गावी झाला.
लालबहादूर शास्त्री यांचे मूळ नाव लालाबहादूर शारदाप्रसाद वर्मा! पण १९२५ मध्ये बनारस येथील काशी विद्यापीठाची ‘शास्त्री’ ही पदवी लालबहादूर यांनी मिळविली आणि ते झाले लालबहादूर शास्त्री! शालेय वयातच लाला लजपतरायांनी स्थापन केलेल्या ‘द सर्व्हट्स ऑफ द पीपल सोसायटी’चे सदस्यत्व घेतले. १९२९ पासून ते नेहरूंच्या सहवासात आले आणि देशाच्या सर्वोच्च राजकीय वर्तुळात त्यांचा समावेश झाला. १९५२ नंतर त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात रेल्वे व वाहतूक, दळणवळण, वाणिज्य व उद्योग आणि गृहमंत्रीपद भूषविले. पंडितजींच्या निधनानंतर ते देशाचे पंतप्रधान झाले. दि. ९ जून
१९६४ रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतलेल्या शास्त्रींनी अल्पावधीतच भारतीय राजकारणावर आपला ठसा उमटविला. १९६५ च्या पाकशी झालेल्या युद्धात देशास खंबीर नेतृत्व दिले आणि देशाची प्रतिमा उजळून टाकली. ‘जय जवान, जय किसान’ या त्यांच्या मंत्राने अवघा देश भारावून गेला. अवघ्या १९ महिन्यांच्या कालावधीत जनसामान्यांच्या हृदयात त्यांनी अढळ स्थान मिळविले होते.
लालबहादूर शास्त्री यांचे ११ जानेवारी १९६६ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply