माजी सरसंघचालक प्रो.राजेंद्र सिंग ऊर्फ रज्जू भैय्या यांचा जन्म २९ जानेवारी १९२२ रोजी उत्तरप्रदेश मधील बुलंदशहर जिल्हयातील शिकारपूर गावी झाला.
रज्जू भैय्या हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४ थे सरसंघचालक होते. रज्जू भैय्या यांचे वडील उत्तरप्रदेशात मुख्य अभियंता म्हणून काम करत होते.
रज्जू भैय्या यांचे शिक्षण बुलंदशहर, नैनीताल, उन्नाव, प्रयाग व दिल्लीत झाले. त्यांनी बी.एस.सी. व एम.एस.सी. पर्यंत शिक्षण घेतले होते. रज्जू भैय्या यांचा संघाशी संबंध १९४२ नंतर प्रयाग मध्ये असताना आला. नंतर ते नियमित संघाच्या शाखेत जाऊ लागले. ते त्या वेळचे सरसंघचालक श्री गुरुजी यांच्या कार्याने प्रभावित झाले होते. १९४३ रज्जू भैया यांनीं काशी मधून प्रथम वर्ष संघाचे शिक्षण पूर्ण केले. या शिक्षणाने त्यांनी आपले जीवन संघाला वाहून देण्याचे ठरवले.
१९४३ ते १९६६ पर्यत ते प्रयाग विश्वविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. प्राध्यापक असलेले रज्जू भैया संघाच्या कार्य व प्रचारासाठी उ.प्र. मध्ये बसने प्रवास करत असत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुढील वर्षापासून संघाची पहिली सैनिकी शाळा सुरू करणार आहे. या शाळेचे नाव राजेंद्र सिंह यांच्या नावावरून ‘रज्जू भैय्या सैनिक विद्या मंदिर’ असे असणार आहे. रज्जू भैय्या सैनिक विद्या मंदिरची पहिला शाखा उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर जिल्ह्यातील शिकारपूर येथे सुरू केली जाणार आहे,जेथे रज्जू भैया यांचा जन्म झाला होता.
रज्जू भैय्या यांचे १४ जुलै २००३ रोजी निधन झाले.
Leave a Reply