नवीन लेखन...

माजी कसोटीपटू हेमंत कानिटकर

हेमंत कानिटकर यांनी दोन कसोटी सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. स्थानिक क्रिकेटमध्ये त्यांनी अमिट ठसा उमटविला. त्यांचा जन्म ८ डिसेंबर १९४२ रोजी झाला. डिसेंबर १९६३मध्ये सौराष्ट्राविरुद्धच्या सामन्याद्वारे कानिटकर यांनी रणजी पदार्पण केले होते. या सामन्यांत त्यांनी नाबाद १५१ धावांची अविस्मरणीय खेळी केली होती. रणजी करंडक स्पर्धेत त्यांनी मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा मान दोन वेळा मिळविला. १९७०-७१च्या मोसमात कानिटकर यांनी प्रथम श्रेणीतील नऊ सामन्यांत ८६.७७च्या सरासरीने ७८१ धावा केल्या होत्या. त्यात रणजीमधील सात सामन्यांत त्यांनी ९८.१४च्या सरासरीने ६८७ धावा केल्या होत्या. त्या जोरावरच महाराष्ट्राने १९७०-७१च्या रणजी मोसमात अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. नेहरू स्टेडियममध्ये मार्च १९७१मध्ये झालेल्या राजस्थानविरुद्धच्या उपांत्यपूर्व लढतीत त्यांनी २५० धावांची खेळी केली होती. ही प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्यांची सर्वोच्च धावसंख्या ठरली. त्यानंतर १९७१-७२च्या मोसमात ५१.६०च्या सरासरीने ५१६ धावा, १९७२-७३च्या मोसमात ५६.४५च्या सरासरीने ६२१ धावा केल्या होत्या. स्थानिक क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्यांना १९७४मध्ये विंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळण्याची संधी मिळाली. १९६३ ते १९७८ दरम्यानच्या आपल्या प्रथण श्रेणीतील कारकीर्दीत कानिटकर यांनी ८७ सामन्यांत ४२.७८च्या सरासरीने तेरा शतके आणि २३ अर्धशतकांसह ५००६ धावा केल्या. तसेच, यष्टीरक्षक म्हणून ८७ विकेट्स मिळविल्या. १९७४ मध्ये बेंगळुरू येथे झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्याद्वारे त्यांनी कसोटीत पदार्पण केले होते. यष्टिरक्षक फलंदाज असलेल्या कानिटकर यांनी पदार्पणातच विंडीजसारख्या तगड्या संघाविरुद्ध ६५ धावांची खेळी केली होती. दोन कसोटींत त्यांनी २७.७५च्या सरासरीने एकूण १११ धावा केल्या.

हेमंत कानिटकर यांचे ९ जून २०१५ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर. 

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..