अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांचा जन्म २९ मे १९१७ रोजी ब्रुकलिन, मॅसॅच्युसेट्स, अमेरिका येथे झाला.
जॉन फिट्झजेराल्ड केनेडी उर्फ जॉन एफ केनडी हे अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष होते. जॉन एफ. केनेडी याचे वडील इंग्लंडमध्ये अमेरिकेचे वकील म्हणून काम करत होते. आपल्या पदवी शिक्षणानंतर जॉन याने वडिलांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले. त्यानंतर नौदलात नोकरी ज्यात केनेडी दुसऱ्या महायुद्धात दक्षिण प्रशांत महासागर आघाडीवरील युद्धमोहिमेत प्रत्यक्ष लढले होते. पुढे पत्रकारितेत काही काळ घालवून त्याने राजकारणात प्रवेश केला. १९४७ ते १९५३ पर्यंत अमेरिकन प्रतिनिधिगृहात मॅसेच्युसेट्सच्या ११व्या संसदीय जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. १९५३ साली त्यांची सिनेटर म्हणून निवड झाली. १९६१ मधील अध्यक्षीय निवडणुकींत ते रिचर्ड निक्सन यांच्या विरुद्ध उभे ठाकले व निवडणुकींत विजयी होऊन अमेरिकेचा ३५ वे राष्ट्राध्यक्ष बनले. १९६१ सालीच क्यूबाच्या विरोधात अमेरिकेने चालवलेल्या मोहिमेत त्यांनी खंबीर भूमिका घेऊन रशियाला क्यूबामधून क्षेपणास्त्रे मागे घ्यायला भाग पाडले. १९६३मध्ये केनेडी प्रशासनाने रशिया व ब्रिटन यांच्याशी मर्यादित अण्वस्त्र चाचणीबंदी करार केला. अवकाश मोहिमा राबवण्यासाठी पुढाकार घेऊन पहिले अंतराळ-उड्डाण यशस्वी केले. चंद्रावर मानव पाठवण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रमही केनेडी प्रशासनाच्या कार्यकाळात आखला गेला. अमेरिकेत सामाजिक विषमतेबरोबरच आर्थिक विषमता दूर करण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी आर्थिकदृष्ट्या मागास क्षेत्रात मदत देण्यासाठी केनेडी प्रशासनाने विधेयक मंजूर करून घेतले. वृद्धांची काळजी व कॄषिविकासासाठी त्याने एक कार्यक्रम अमेरिकन संसदेपुढे मांडला होता; पण तो संमत करून घेण्यात त्यांना यश आले नाही.
जॉन एफ केनेडी यांची २२ नोव्हेंबर १९६३ रोजी ते पदावर असतानाच हत्या करण्यात आली.
Leave a Reply