नवीन लेखन...

वेस्ट इंडिजचे माजी खेळाडू अल्विन कालिचरण

वेस्ट इंडिजचे माजी खेळाडू अल्विन कालिचरण यांचा जन्म २१ मार्च १९४९ रोजी झाला.

गॅरी सोबर्स, ब्रायन लारा, क्रिस गेल यासारख्या शैलीदार डावखुऱ्या फलंदाजांची फौज विंडीजकडे मौजूद होती. त्यात आणखी एक वामनमूर्ती म्हणजे अल्विन कालिचरण. छोट्या चणीच्या डावखुर्या कालिचरणची कसोटी कारकीर्द जेमतेम ९ वर्षांची (१९७२-८१). वर्णद्वेषी द.आफ्रिकेच्या दौऱ्यावर बंडखोर (रिबेल्स) खेळाडूंच्या संघाचे नेतृत्व केल्यामुळे मायदेश गयानात त्याला लोकांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले. परिणामी त्याची उमलू पाहणारी कसोटी कारकीर्द अचानक संपुष्टात आली. तिशीतच कारकिर्दीला खीळ बसल्यामुळे ऑरेंज फ्री स्टेट, ट्रान्सबॉल या संघाकडून द.आफ्रिकेत तो खेळला. सध्या त्याचा मुक्काम इंग्लंडमध्ये असतो. गेल्यावर्षीच त्याला ब्रिटिश एम्पायर मेडल देऊन गौरविण्यात आले.
आपल्या छोट्याशा कारकिर्दीत वामनमूर्ती कालिचरणने अनेक संस्मरणीय खेळी केल्या. त्यापैकी प्रकर्षाने आठवण येते. १९७५ च्या वर्ल्डकपमधील त्याच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या खेळीची. डेनिस लिली या तेजतर्रार गोलंदाजावर त्याने चढवलेला प्रतिहल्ला विलक्षणच! हुक्स, पूल्स, ड्राइव्हज, कट्सचा वापर करत कालिचरणने फटकेबाजी केली.

४,४,४,४,४,१,४,६,०,४ अशा दहा चेंडूंत ३५ धावा त्याने लिलीच्या गोलंदाजीवर चोपून काढल्या. त्यामुळे ओव्हलवरील विंडीजचे चाहते सुखावले. उपांत्य फेरीच्या लढतीत त्याने न्यूझीलंडविरुद्ध सामनावीराचा किताब पटकावताना ७२ धावा तडकावल्या. ६६ कसोटींच्या कारकिर्दीत कालिचरणने ९ सामन्यांत विंडीजचे नेतृत्व केले. (क्लाईव्ह लॉईड अनपेक्षितपणे पॅकर सर्कशीत दाखल झाल्यामुळे कालिचरणला नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारावी लागली.) १९७८-७९ च्या भारत दौर्या त दुय्यम खेळाडूंचा समावेश असलेल्या विंडीज संघाचे नेतृत्व त्याने शिताफीने केले. मायदेशातील ६ सामन्यांच्या मालिकेत सुनील गावस्करच्या भारतीय संघाला घाम गाळावा लागला. वानखेडेच्या सलामीच्या कसोटीत प्रतिस्पर्धी कर्णधार गावस्कर आणि कालिचरण यांनी झळकावलेली शतके निव्वळ अविस्मरणीय! गावस्करने साडेसहा तासांत २ षटकार, २९ चौकारांनिशी २०५ धावा फटकावल्या, तर डावखुर्या् कालिचरणने २६ चौकारांनिशी १८७ धावा तडकावत विंडीजला पहिल्या डावात आघाडी मिळवून दिली, तेव्हाच ही मालिका भारतासाठी सोपी नाही हे स्पष्ट झाले.

सामनावीराचा किताबही कालिचरणनेच पटकावला. नॉरर्बट फिलिप, सिल्वेस्टर क्लार्क, माल्कम मार्शल या तेज त्रिकुटाने भारताला मालिका सहजासहजी जिंकू दिली नाही. १९७७-७८ च्या मोसमातही लॉईडच्या गैरहजेरीत कालिचरणने तीन कसोटीत विंडीजचे नेतृत्व केले. जॉर्ज टाऊन, गयाना कसोटीत घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना मात्र कालिचरणला पराभवाला सामोरे जावे लागले. सिंप्सनच्या ऑस्ट्रेलियन संघाने विंडीजवर ३ गडी राखून विजय संपादला. अपयशी सलामीनंतर कर्णधार कालिचरण सावरला आणि पुढच्याच कसोटीत (पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद) विंडीजने ऑस्ट्रेलियाचा १९८ धावांनी दणदणीत पराभव करून मालिका ३-१ अशी खिशात घातली. (पहिल्या दोन कसोटीत क्लाईव्ह लॉईडने विंडीजचे नेतृत्व केले होते.)

डेनिस लिली, जेफ थॉमसन या ऑस्ट्रेलियन तेज जोडगोळीचा बिना हेल्मेटने खेळणार्या कालिचरणने बेडरपणे सामना केला. मायकल होल्डिंगप्रमाणेच जेफ थॉमसनही वेगात गोलंदाजी करायचा आणि चेंडू कानाजवळून सूडसू करत जायचे याची आठवण अजूनही कालिचरणला आहे.

विंडीजचा त्याचा सहकारी अँडी रॉबर्ट्स हा त्याच्या मते सर्वात वेगवान गोलंदाज, विंडीज तोफखान्याचा तो जणू भिष्माचार्यच! बेदी, प्रसन्ना, चंद्रा या भारतीय फिरकी त्रिकुटाबद्दल त्याला प्रचंड आदर वाटतो. बेदीच्या गोलंदाजीतील विविधतेचे त्याला अपार कौतुक. इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत या दोन डावखुर्यांयतील द्वंद्व विलक्षण रंगायचे. प्रसन्ना चेंडूला उंची देण्यात पटाईत होता. तो फिरकी गोलंदाज असूनही त्याचे काही चेंडू फार वेगात पडायचे असे तो सांगतो. व्हीव्ह रिचर्ड्ससारखा स्फोटक फलंदाज पुन्हा होणे अवघड, त्याची राजेशाही चालच प्रतिस्पर्ध्यांना नाउमेद करत. ग्रेग चॅपलच्या फलंदाजीची सहजसुंदर शैली कालिचरणला विलक्षण आवडायची. कालिचरण अमेरिकेत प्रशिक्षण देतो. फटकेबाजी जरूर करा, पण बचाव करायलाही शिका हा त्याचा सध्याच्या जमान्यात फंडा. अल्विन कालिचरण कलर ब्लाइंड या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे.

— शरद कद्रेकर.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..