स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका इंदुमती पारीख यांचा जन्म ८ मार्च १९१८ रोजी झाला.
इंदुमती पारीख या व्यवसायाने डॉक्टर व एक बुद्धिवादी सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांनी मुंबईमधील झोपडपट्ट्यातील निवासी लोकांच्या उत्कर्षासाठी काम केले आहे. मुंबईमध्ये त्यांनी एम.एन. रॉय सेंटरची स्थापना केली. रॅडिकल ह्युमॅनिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेच्या त्या अध्यक्षा होत्या. १९८४ ते १९८९ या काळात भारत सरकार आणि फोर्ड फाऊंडेशन यांच्यासह त्यांनी सामान्य नागरिकांसाठी ” डॉक्टर नसेल तेव्हा..” या उपक्रमाचे दायित्व सांभाळले.
इंग्रजी आणि मराठीमधील वैज्ञानिक नियतकालिकांत त्या सातत्याने लेखन करीत असत. ‘समाजविकासासाठी व्यक्तिविकास’ हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. महाराष्ट्रातील एक विचारवंत व शिक्षणतज्ञ गोवर्धन पारीख यांच्या त्या पत्नी होत.
इंदुमती पारीख यांचे १७ जून २००४ रोजी निधन झाले.
Leave a Reply