नवीन लेखन...

अमेरिकेतील फ्रेंडस् लायब्ररी

लेक फॉरेस्ट इथल्या EI Toro Branch Library या लायब्ररीला आम्ही भेट दिली. Friends of the library bookstore खरं तर आम्ही लायब्ररीत शिरलोच नाही. या तिच्या दर्शनी भागात बाहेर साधारण चार, साडेचार फूट उंचीच्या तीन रॅक्स होत्या. त्यामध्ये भिन्न आकारांची, उत्तम कागद, रंगीत, छपाई, बांधणी आणि दर्जेदार पुस्तकं होती. जणू काही नवीनच. कोणी वापरली आहेत, खुणा केल्या आहेत, मधली पानं फाटली आहेत, कव्हरं गेली आहेत, शिवण उसवली आहे, मालकाने आपले नाव लिहिले आहे किंवा धुळीनं माखली आहेत, असा प्रकार नव्हता.

साधारणत: अमेरिकेत लायब्ररीयन दर दिवशी आपल्या अखत्यारीत तुलनेने वाचनात नसलेली, जुनी आवृत्ती झालेली, जादा ठरलेली पुस्तकं २५-३०-५०-७५ सेंट्सना किंवा एका डॉलरला विकायला काढतात. तशी ती काढलेली असावीत असं वाटलं.

मी त्यांच्यातून cinema today, Remember Perl Harbour आणि माझ्या पत्नी ने Salads अशी पुस्तकं निवडली. त्यानंतर मी लायब्ररीत जाऊन काऊंटरमागे असलेल्या वृध्देला वीस डॉलर देऊ केले. ती मला म्हणाली, ‘तुला एक डॉलरची बॅग खरेदी करावी लागेल. म्हणजे तुला हवी तेवढी बॅगभर पुस्तकं घेता येतील.’ याचा अर्थ असा होता की मी आधी प्लास्टिकची बॅग आधी विकत घ्यायची.. किमान लायब्ररीचा तसा नियम असावा. मी बाहेर आलो आणि पत्नीला आणखी एक पुस्तक घ्यायला सांगितले. तिनं ‘Gifts in the jar’ हे पुस्तक निवडलं.

मग मी ती चार पुस्तकं घेऊन आत गेलो आणि त्या वृध्देला पाच डॉलरची नोट देऊ केली. तिनं मला चार डॉलर परत केले. मी तिला चार पुस्तकं आणि एक बॅग मिळून पाच डॉलर झाल्याचे पटवून देऊ लागलो. तेव्हा उलट तीच मला सांगू लागली की, ‘पिशवीत आणखी जागा आहे, तू आणखी काही पुस्तके घेऊ शकतोस.’ ते ऐकल्यावर आश्चर्याचा धक्का मला बसला. माझ्या कानावर जे काही पडले होते आणि जे मला समजले होते त्याची खात्री करण्यासाठी मी तिला, ‘Are you sure?’ असे विचारले. त्यावर तिने होकारार्थी मान हलवली.

त्या नंतर आम्ही पुढील पुस्तकं निवडली-

The Charleston Program

The Search

The Celestine Prophecy-An adventure

Hope In Ths Dark Time

Twelve Golden Threads

ती निवड करीत असताना एक अमेरिकन गृहस्थ आले. पुस्तकं निवडताना ते म्हणाले, ‘It is very cheap.. a dollar each.. lots of books available.. youngsters do not read books. Do not know what they do.. may be watching tv shows..’ त्यांनी मोठी जाडी पुस्तकं निवडली. त्यात एक ‘Literature and letters’ नावाचं एक होतं. त्याच्या लेखकांच नाव माझ्या परिचयाचं होतं. मी त्या गृहस्थांना तसं सांगितलं तर ते म्हणाले की, त्यांच्या विद्यार्थिदशेत ते पुस्तक बाजारात नवीनच आले होते आणि गाजलेले पुस्तक होते. तेव्हा त्यांनी ते वाचलेले होते आणि आता पुन्हा ‘वाचताना त्यांना पुन:प्रत्ययाचा आनंद मिळणार होता..

त्या कॅम्पसमधून बाहेर पडण्यापूर्वी आठवण म्हणून लायब्ररीच्या दर्शनी भागाचे मी आवर्जून फोटो घेतले. लायब्ररीतला हा सुखद अनुभव म्हणायला हवा !

— डॉ. अनंत देशमुख

(अनघा प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या ओ अमेरिका ह्या पुस्तकामधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..